पैसे तयार ठेवा! या आठवड्यात येणार तीन महत्त्वाचे आयपीओ, मालामाल होण्याची चांगली संधी!
या आठवड्यात एकूण तीन आयपीओ येणार आहेत. त्यामुळे आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूक करून पैसे कमवण्याची ही चांगली संधी आहे.
मुंबई : याआधीचा भांडवली बाजाराचा आठवडा आयपीओच्या (प्रारंभिक समभाग विक्री) दृष्टीने तसा सुस्तच होता. कारण गेल्या आठवड्यात जेएमके इंडिया (JNK India) या एकाच कंपनीचा आयपीओ आला. ही कंपनी आता 30 एप्रिल रोजी बीएसई आणि एमएसईवर सूचिबद्ध होणार आहे. सध्याचा चालू आठवडा मात्र गुंतवणूकदारांची चांगला ठरू शकतो. कारण या आठवड्यात एकूण तीन आयपीओ भांडवली बाजारात दाखल होणार आहेत. या तीन आयपीओंच्या माध्यमातून गुंतवणूकदार चांगली कमाई करू शकतात. याच पार्श्वभूमीवर हे तीन नवे आयपीओ कोणते आहेत? या कंपन्या नेमकं काय करतात? हे जाणून घेऊ या...
तीन आयपीओ सूचिबद्ध होणार
चालू आठवड्यात एमफोर्स ऑटोटेक (Emmforce Autotech), शिवम केमिकल्स (Shivam Chemicals) आणि वार्या क्रिएशन्स (Varyaa Creations) या कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहेत. दुसरीकडे तीन कंपन्यांचे आयपीओ याच आठवड्यात लॉन्च होणार आहेत. यामध्ये हे तिन्ही आयपीओ (IPO) हे एसएमई श्रेणीतील आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या तिन्ही आयपीओंना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाची सुरुवात आयपीओच्या दृष्टीने समाधानकारक राहिलेली नाही. मात्र आता वेगवेगळ्या कंपन्यांचे आयपीओ येत असून भविष्यात या क्षेत्रात चांगली गुंतवणूक होऊ शकते तसेच गुंतवणूकदारांनाही चांगला फायदा होऊ शकतो.
साई स्वामी मेटल्स अँड अलॉय (Sai Swami Metals and Alloys)
या कंपनीचा आयपीओ 30 एप्रिल रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार असून 3 मे रोजी बंद होणार आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनी एकूण 15 कोटी रुपये उभारणार आहे. या आयपीओच्या एका शेअरचे मूल्य हे 60 रुपये आहे. या कंपनीच्या आयपीओत तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर एकावेळी 2000 शेअरचा लॉट खरेदी करावा लागेल. गुंतवणुकीत उभारलेल्या निधीचा 50 टक्के हिस्सा हा रिटेल इन्हेस्टर्ससाठी ठेवण्यात येणार आहे. ही कंपनी स्टेनलेस स्टील प्रोडक्ट्सचे ट्रेडिंग आणि मार्केटिंग करते.
एमके प्रोडक्ट्स (Amkay Products)
एमके प्रोडक्ट्स ही कंपनी औद्योगिक तसेच आरोग्यविषयक उपकरणं तयार करतात. या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी 30 एप्रिल ते 3 मेपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 12.61 कोटी रुपये उभारणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 52 ते 55 रुपये आहे. या आयीओच्या एका लॉटमध्ये 2000 शेअर्स आहेत. आयपीओतून उभारलेल्या निधीचा 35 टक्के हिस्सा हा रिटेल इन्हेस्टर्ससाठी राखून ठेवण्यात आलेला आहे.
स्टोअरेज टेक्नॉलॉजी अँड ऑटोमेशन (Storage Technologies and Automation)
या कंपनीचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी 30 एप्रिल रोजी खुला होणार असून 3 मे रोजी बंद होणार आहे. आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी 29.95 कोटी रुपये उभारणार आहे. 73-78 रुपये किंमत पट्ट्याने ही कंपनी भागविक्री करणा आहे. या कंपनीच्या आयपीओत तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर एका लॉटमध्ये तुम्हाला 1600 शेअर्स खरेदी करावे लागतील. आयपीओतून उभारलेल्या निधीतून 35 टक्के हिस्सा हा रिटेल इनव्हेस्टर्ससाठी ठेवण्यात येणार आहे. ही कंपनी मेटल स्टोअरेज रॅक्स, ऑटोमोटिव्ह वेअरहाऊस आणि स्टोअरेज प्रोडक्स तयार करते.
(टीप - फक्त माहिती देणे हाच या लेखामागचा उद्देश आहे. आम्ही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. गुंतवणूक करायचा असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
पीएफ खातेधारकांना मोफत मिळतो 7 लाखांचा जीवन विमा, पण नेमका कसा? जाणून घ्या नियम काय?
गेल्या वर्षाचा ITR या वर्षी भरता येईल का? दंड किती लागतो? जाणून घ्या नियम काय सांगतो!
शेतकऱ्यांनो 'या' तीन योजनांचा घ्या फायदा, आर्थिक अडचण हमखास होईल दूर!