शेतकऱ्यांनो 'या' तीन योजनांचा घ्या फायदा, आर्थिक अडचण हमखास होईल दूर!
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवते. मात्र या तीन योजनांचा फायदा घेतल्यास शेतकऱ्यांच्या अने अडचणी दूर होऊ शकतात.
मुंबई : शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच पेरणी, कापणी अशा वेगवेगळ्या कामांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना पैसे मिळतात आणि कठीण काळात शेती करू शकतात. दरम्यान, शेतकऱ्यांच्या अशा तीन वेगवेगळ्या योजना आहेत, ज्याचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे. या तिन्ही योजनांचा फायदा घेतल्यास त्यांना चांगली मदत होऊ शकते. या योजनांच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे येतात.
पंतप्रधान पीक विमा योजना
यामध्ये सर्वांत पहिला क्रमांक आहे तो पंतप्रधान पीक वीमा योजनेचा. शेतात लावलेल्या पिकाचे नुकसान झाल्यावर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाते.नैसर्गिक संकट, कीड लागणे, दुष्काळ पडणे या कारणामुळे शेतकऱ्यांचे पीक गेले, नुकसान झाले तर सरकार अशा शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक वीमा योजनेच्या माध्यमातून मदत करते.
किसान क्रेडिट कार्ड
किसान क्रेडिट कार्ड हीदेखील शेतकऱ्यांसाठीची एक खास योजना आहे. ही योजना 1998 सालापासून अस्तित्वात असून तिच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने साधारण तीन लाख रुपयांपर्यंत दिले जाते. आतापर्यं या योजनेचा लाभ जवळपास अडीच कोटी शेतकऱ्यांनी घेतलेला आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी कोणत्याही शेकऱ्याला अर्ज करता येतो. सहा हजार रुपयांची ही मदत शेतकऱ्यांना तीट टप्प्यांत मिळते. प्रत्येक चार महिन्यांला ही मदत शेतकऱ्यांना दिली जाते. अधिकृत संकेतस्थळावर जाऊनही या योजनेसाठी अर्ज करता येतो.
हेही वाचा :
1 मे पासून ICICI बँकेचे नियम बदणार, 'या' सेवांसाठी द्यावे लागणार पैसे!
डी-मॅट अकाऊंटवर आकारले जातात 'हे' चार्जेस, नीट समजून घ्या अन्यथा खिसा होईल खाली!