Ind vs SA 4th T20 Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT; चर्चेत नसलेल्या खेळाडूला मिळाली संधी
Ind vs SA 4th T20 Match: भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेतील चौथा टी-20 सामना 17 डिसेंबर रोजी लखनौ येथील एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याआधी बीसीसीआयने टीम इंडियामध्ये बदल केले आहेत.

Ind vs SA 4th T20 Match: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबर 2025 रोजी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने उल्लेखनीय पुनरागमन केले आणि तिसरा टी-20 सामना जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. आता मालिकेतील चौथा टी-20 सामना 17 डिसेंबर रोजी लखनौ येथील एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याआधी बीसीसीआयने टीम इंडियामध्ये बदल केले आहेत. (Team India Squad Change Ind vs SA 4th T20 Match)
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला (Axar Patel) दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यांमधून वगळण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ असल्यामुळे अक्षर पटेलला मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमधून बाहेर काढण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. अक्षर पटेलच्या जागी आता अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमदचा (Shahbaz Ahmed) समावेश करण्यात आला आहे. (Ind vs SA 4th T20 Match)
🚨 NEWS 🚨#TeamIndia allrounder, Axar Patel has been ruled out of the remaining two @IDFCFIRSTBank T20Is against South Africa due to illness.
— BCCI (@BCCI) December 15, 2025
🔽 Details | #INDvSA | @akshar2026 https://t.co/CZja7iaLNm
शाहबाज अहमदला टीम इंडियामध्ये संधी- (Shahbaz Ahmed Ind vs SA T20 Series)
अक्षर पटेलच्या जागी बंगालचा अष्टपैलू शाहबाज अहमदला टीम इंडियामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी शाहबाजने भारतासाठी तीन एकदिवसीय आणि दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, परंतु टीम इंडियासाठी शेवटचा सामना सप्टेंबर 2023 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत हांगझोऊ येथे अफगाणिस्तानविरुद्ध होता. शाहबाज अहमदने आतापर्यंत भारतीय संघासाठी टी-20 मध्ये दोन फलंदाजांना बाद केले आहे. तथापि, त्याला अद्याप फलंदाजीची संधी मिळालेली नाही.
जसप्रीत बुमराहबद्दल कोणतीही अपडेट नाही- (Jasprit Bumrah)
बीसीसीआयने अद्याप वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल कोणतीही अपडेट दिलेली नाही. वैयक्तिक कारणांमुळे बुमराह मायदेशी परतल्यामुळे तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी देखील उपलब्ध नव्हता. मात्र आताही जसप्रीत बुमराहबाबत बीसीसीआयने सामील होण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत अपडेट नाही. हर्षित राणाने बुमराहच्या अनुपस्थितीत तिसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ: (Team India Squad Ind vs SA T20)
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद.





















