पीएफ खातेधारकांना मोफत मिळतो 7 लाखांचा जीवन विमा, पण नेमका कसा? जाणून घ्या नियम काय?
ईपीएफओ खाते असेल तर अकाली मृत्यूनंतर खातेधारकाच्या नॉमिनीला सात लाखांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते. ती कशी मिळवायची? हे जाणून घ्या.
मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वान निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ (EPFO) आपल्या खातेधारकांना जीवन विमा देते. या विम्याअंतर्गत ईपीएफओ मेंबरला जास्ती जास्त सात लाखांचा विमा मिळतो. ईपीएफओच्या या योजनेला इम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (Employees Deposit Linked Insurance-EDLI) या नावाने ओळखले जाते. ही योजना काय आहे, यातून ईपीएफओ खातेधारकांना काय फायदा होतो, हे जाणून घेऊ या.
EDLI योजना काय आहे
EPFO तर्फे EDLI या योजनेची सुरुवात 1976 साली करण्यात आली होती. ईपीएफओ सदस्याचा काही कारणास्तव मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाला आर्थिक मदत व्हावी यासाठी ही योजना चालू करण्यात आली होती. हा विमा ईपीएफओ कर्मचाऱ्याला एकदम मोफत दिला जातो. EDLI योजनेसाठी कंपनीकडून योगदान दिले जाते.
विम्याची रकम कशी ठरवली जाते?
विम्याची रक्कम ठरवण्यासाठी काही सूत्रांचा अवलंब केला जाते. गेल्या बारा महिन्यांचा बेसिक पगार आणि डीए यांच्यावर विम्याची रक्कम निश्चित केली जाते. या विम्याचा क्लेम करायचा असेल तर हा क्लेम शेवटच्या पगारातील बेसिक सॅलरी + डीए यांच्या 35 पट असेल. क्लेम करणाऱ्यालाही 1,75,000 रुपयांपर्यंत बोनस रक्कम मिळू शकते.
जोपर्यंत नोकरी, तोपर्यंत विमा
EPFO सदस्याची जोपर्यंत नोकरी असेल तोपर्यंतच त्याला EDLI योजनेअंतर्गत विमा मिळतो. नोकरी गेल्यानंतर ईपीएफओ सदस्याचे कुटुंबीय, उत्तराधिकारी, नॉमिनी या विम्याचा क्लेम करू शकत नाहीत. एखादा एपीएफओ मेंबर सलग 12 महिने नोकरी करत असेल तर त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीला कमीत कमी 2.5 लाख रुपये मिळू शकतात.
नॉमिनेशन नसेल तर काय होणार?
नोकरी करताना कर्मचाऱ्याचा आजार, दुर्घटना यामुळे किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास EDLI योजनेअंतर्गत विम्याच्या रकमेसाठी क्लेम करता येतो. EDLI या योजनेअंतर्गत ईपीएओ खातेधारकाने नॉमिनी नोंदवलेला नसेल तर मृत कर्मचाऱ्याचा जोडीदार, अविवाहित मुली, अल्पवयीन मुलं हे लाभार्थी मानले जातात.
क्लेम कसा करायचा?
ईपीएफओ खातेधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास त्याचे नॉमिनी किंवा उत्तराधिकारी विम्याच्या रकमेवर क्लेम करू शकतात. यासाठी नॉमिनीचे वय कमीत कमी 18 वर्षे असणे गरजेचे आहे. नॉमिनी अल्पवयीन असेल तर त्याचे पालक यासाठी क्लेम करू शकतात. त्यासाठी मृत्यूचे प्रमाणपत्र, सक्सेशन सर्टिफिकेट आणि इतर कागदपत्रे लागतात.
हेही वाचा :
PPF की FD ? गुंतवणूक नेमकी कशात करावी? जाणून घ्या फायदे आणि तोटे?
घरासाठी कर्ज घेण्याचा विचार करताय? 'या' बँकांचा आहे सर्वांत कमी व्याजदर!
गेल्या वर्षाचा ITR या वर्षी भरता येईल का? दंड किती लागतो? जाणून घ्या नियम काय सांगतो!