एक्स्प्लोर
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
Share Market : भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण कायम आहे. 10 डिसेंबर रोजी गुंतवणूकदारांचे 1.09 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
शेअर मार्केट
1/6

Share Market Today: भारतीय शेअर बाजारात सलग दोन दिवसांपासून सुरु असलेली घसरण तिसऱ्या दिवशी देखील कायम आहे. 10 डिसेंबरला सलग तिसऱ्या दिवशी देखील घसरण सुरु आहे. आज सकाळी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर बाजार पुन्हा घसरला.
2/6

शेअर बाजार दुपारी साडे तीन वाजता बंद झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये 275.01 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स 84391.27 अंशांवर बंद झाला. तर, एनएसई निफ्टी 50 मध्ये 81.65 अंकांची घसरण पाहाला मिळाली. यामुळं निफ्टी 25758 अंकांवर बंद झाला.
3/6

गुंतवणूकदारांकडून अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या निकालांच्या निमित्तानं सावध भूमिका घेतली जात आहे. फेड बैठकीचे निकाल आज जाहीर होऊ शकतात. विदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्यानं होणारी घसरण आणि जागतिक बाजारातील कमजोर संकेत यामुळं शेअर बाजार गडगडला.
4/6

बाजारात सुरु असलेल्या घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. बुधवारी बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य मंगळवारच्या तुलनेत 1.09 लाख कोटी रुपयांनी घटलं म्हणजेच गुंतवणूकदारांचं 1.09 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं.
5/6

बीएसई मिडकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरला. दुसरीकडे स्मॉलकॅप निर्देशांकाचा विचार केल्यास त्यात 0.58 अंकांची घसरण पाहायला मिळाली. आयटी, टेलिकॉम, फायनान्शिअल आणि इंडस्ट्रियल शेअरमध्ये घसरण झाली.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 10 Dec 2025 08:58 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























