लवकरच Inox Green Energy कंपनीचा IPO बाजारात, निधी उभारण्यास बोर्डाची मान्यता
IPO निधीद्वारे कंपनी 500 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन इक्विटी शेअर बाजारात आणणार असल्याची माहिती INOX WIND ने दिली आहे.
Inox Green Energy: आयनॉक्स विंडची उपकंपनी आयनॉक्स ग्रीन एनर्जी लवकरच इनिशियल सार्वजनिक ऑफर (IPO) लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी या IPO च्या माध्यमातून 500 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. विंड एनर्जी कंपनीने सोमवारी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.
कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या नोटीशीमध्ये म्हटले आहे की, “आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, कंपनीच्या मटेरियल सब्सिडियरी फर्म, आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड (Inox Green Energy Services Limited) (पूर्वीचे नाव आयनॉक्स विंड इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस लिमिटेड) चे संचालक मंडळाच्या संचालकांची आज म्हणजेच 6 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत कंपनीच्या निधी उभारणीच्या योजनेला मंजुरी देण्यात आली. यामध्ये भागधारकांकडून अर्थात शेअर होल्जर्डकडून मंजुरी मिळणे बाकी आहे."
कंपनी OFS देखील आणू शकते
IPO निधीद्वारे कंपनी 500 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन इक्विटी शेअर बाजारात आणणार असल्याची माहिती INOX WIND ने दिली आहे. त्याचप्रमाणे यामध्ये ऑफर-फॉर-सेल (OFS) देखील लॉन्च केला जाऊ शकतो, ज्या अंतर्गत कंपनीचे विद्यमान आणि पात्र भागधारक त्यांचे शेअर्स विक्रीसाठी ठेवू शकतील.
दरम्यान, आयनॉक्स विंडचे शेअर्स सोमवारी NSE वर सुमारे एक टक्क्याने घसरून 144.10 रुपयांच्या किमतीवर व्यवहार करत होते. आयनॉक्स विंड हा 2021 चा मल्टीबॅगर स्टॉक आहे, ज्याने या वर्षी आतापर्यंत सुमारे 124.28% परतावा दिला आहे. दुसरीकडे, जर आपण गेल्या एका वर्षाबद्दल बोललो तर त्याने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 181.17% परतावा दिला आहे.
आयनॉक्स विंड ही पवन ऊर्जेच्या बाजारपेठेतील एक पूर्णतः एकात्मिक कंपनी आहे. अहमदाबाद (गुजरात) जवळ ब्लेड आणि ट्यूबलर बनवण्याचा कारखाना आहे. त्याचप्रमाणे हब आणि नेकलेस बनवण्यासाठी हिमाचल प्रदेशातील उना येथे त्याचा उत्पादन कारखाना आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha