Share Market : शेअर बाजारात हाहा:कार; सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला
Share Market Crash : गुरुवारी शेअर बाजार सुरू होताच घसरण दिसून आली. सकाळी सेन्सेक्स 1000 अंकांनी गडगडला.
Share market updates : मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. गुंतवणुकदारांकडून शेअर्सची चौफेर विक्री सुरू असल्याचा परिणाम बाजारावरही दिसून आला. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 1000 अंकांची घसरण झाली.
शेअर बाजाराच्या प्री-ओपन सत्रापासूनच बाजारात घसरण होण्याचे संकेत मिळत होते. बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 996.23 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 57 हजारांखाली आला. निफ्टीतही घसरण दिसून आली. निफ्टीत जवळपास 1.5 टक्क्यांची घसरण होऊन निर्देशांक 17 हजाराच्या नजीक पोहचला. आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. परदेशी गुंतवणुकदारांनी विक्रीचा सपाटा सुरू केल्याने बाजारात घसरण झाली असल्याची चर्चा आहे. शेअर बाजारात विक्रीचा मोठा दबाव दिसून येत आहे.
दरम्यान, याआधी सलग पाच दिवसाच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजार काही प्रमाणात सावरला होता. मंगळवारी सुरुवातीला 1000 अंकांची घसरण दिसून आली. त्यानंतर बाजार सावरला आणि व्यवहार थांबला तेव्हा सेन्सेक्स 366.64 अंकांनी वधारला होता. तर, निफ्टीत 118.30 अंकानी वधारला.
फेडरल रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचे पडसाद
या आठवड्यात अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी संपली. या दोन दिवसीय बैठकीत फेडरल रिझर्व्हने मार्चमध्ये व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला. या घोषणेचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर दिसून आला. गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू केली. आशियाई शेअर बाजारात घसरण झाली आहे. फेडरल रिझर्व्ह बँक व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेणार असल्याचा अंदाज याआधीत वर्तवण्यात येत होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Adani Wilmar IPO: अदानी समूहात गुंतवणूक करण्याची संधी, आजपासून Wilmar आयपीओ खुला
- Air India Tata : एअर इंडियामध्ये आजपासून 'टाटा' राज; या सेवेद्वारे प्रवाशांच्या सेवेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha