Share Market Updates : शेअर बाजारात तेजीचे संकेत; बाजार उघडताच सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला
Share Market Updates : शेअर बाजारात आज तेजीचे संकेत दिसत असले तरी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याची चिन्ह आहेत.
Share Market Updates : बाजार सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही मिनिटात शेअर बाजारात आज तेजीचे संकेत दिसत आहेत. बाजार उघडताच 174 अंकांनी सेन्सेक्स वधारला. तर, निफ्टीतही 52 अंकांनी वाढ झाली. अमेरिकेतील महागाईच्या उच्चांकाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शेअर बाजारातील प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स, निफ्टीची चांगली सुरुवात झाली. प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 250 अंकांनी तर, निफ्टीत 50 अंकांची तेजी दिसून आली. सिंगापूर एसजीएक्स निफ्टीमध्ये सकाळी नऊ वाजता किंचित घसरण असल्याचे दिसून आले होते. आज बाजार अस्थिर राहण्याची अधिक शक्यता आहे. सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 277 अंकांच्या तेजीसह 53,791.77 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 91 अंकांनी वधारत 16,058.05 अंकांवर व्यवहार करत होता.
निफ्टी 50 पैकी 43 शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. तर, सात शेअर्समध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय, बँक निफ्टी 89.80 अंकांनी वधारत 34917 अंकांवर व्यवहार करत आहे. बँक निफ्टीतील सर्व शेअर्स वधारले आहेत.
निफ्टी आयटी आणि पीएसयू बँक वगळता इतर सर्व सेक्टरमधील निर्देशांक तेजीत आहेत. फार्मा शेअरमध्ये 1.15 टक्क्यांची तेजी दिसत आहे. एफएमसीजीमध्ये 0.62 टक्के आणि ऑटोमध्ये 0.60 टक्क्यांनी शेअर वधारला आहे.
दरम्यान, बुधवारी सेन्सेक्समध्ये 372 अंकांची आणि निफ्टीमध्ये आज 91 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये बुधवारी 0.69 टक्क्यांची घसरण होऊन तो 53,514 अंकावर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.57 अंकांची घसरण होऊन तो 15,966 अंकांवर पोहोचला. शेअर बाजार बंद होताना 1649 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली. तर 1584 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 141 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल नोंदवण्यात आला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या: