US Inflation : अमेरिकेतही आर्थिक संकट, महागाई 40 वर्षातील विक्रमी पातळीवर, भारतावर होणार मोठा परिणाम
US Inflation Surges : अमेरिकेत महागाई 40 वर्षांतील विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. याचा भारतावरही मोठा परिणाम होणार आहे.
America Inflation : भारताच्या (India) शेजारील श्रीलंका (Sri Lanka) देशातील आर्थिक परिस्थिती तर सर्वज्ञात आहे. पाकिस्तानमध्ये (Pakistan) काहीशी तशीच परिस्थिती आहे. यामध्ये आता आणखी एका देशाची भर पडली आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देशापैंकी एक असणाऱ्या अमेरिकेलाही आता आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेतील महागाईचा संपूर्ण जगावर परिणाम होणार आहे. अमेरिकेतील महागाई उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. अमेरिकेत महागाई 40 वर्षांमधील सर्वाधिक पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे याचा परिणाम इतर देशांसह भारतावरही होणार आहे.
अमेरिकेतील महागाईचा दर 9.1 टक्के आहे. भारतीय बाजाराच्या दृष्टीने हा दर दोन टक्क्यांहून अधिक आहे. डॉलरच्या उलाढालीचा परिणाम जगातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. यामुळेच अमेरिकेतील महागाईच्या संकटामुळे आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेसमोरचं संकटही वाढण्याची चिन्ह आहेत.
U.S. prices in June climbed 9.1% from a year earlier, the fastest pace since 1981. The pickup was broad and faster than expected, spelling trouble for the Federal Reserve.
— The New York Times (@nytimes) July 13, 2022
Follow our updates.https://t.co/DMCbL4JNjD pic.twitter.com/mp4A6c5MSS
महागाईनं गाठला चार दशकांतील उच्चांकी दर
अमेरिकेनं चार दशकांच्या इतिहासातील सर्वात उच्चांकी दर गाठला आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर अनेक देशांची अर्थव्यवस्था अवलंबून असते, त्यामुळे याचा परिणाम संपूर्ण जगावर होणार आहे. जगभरात सध्या मंदीचं वातावरण आहे, त्यामध्ये आता महागाईनं डोकं वर काढल्याने संकटामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकेतील महागाईचा भारतावर काय परिणाम होईल?
महागाई वाढल्याने अमेरिकेच्या बँकीग क्षेत्रात अर्थात फेडरल रिजर्व्हच्या दरांमध्ये तीव्र वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदार बाजारतून पैसे काढण्यास सुरुवात करतील. गुंतवणूकदार बाहेर पडल्याने रुपया आणखी घसरण्याची शक्यता आहे. यामुळे आयातही अधिक महाग होऊ शकते. शिवाय अमेरिकन उत्पादनांच्या किंमती देखील वाढतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या