Share Market Updates : शेअर बाजारात विक्रीचा सपाटा; सेन्सेक्स-निफ्टीत घसरण
Share Market Closing Bell : शेअर बाजारात आज विक्रीचा सपाटा दिसून आला. सेन्सेक्समध्ये 111 अंकांची घसरण झाल्याचे दिसून आले.
![Share Market Updates : शेअर बाजारात विक्रीचा सपाटा; सेन्सेक्स-निफ्टीत घसरण Share market closing bell Sensex falls 111 Points Nifty Barely Holds 15750 points level Share Market Updates : शेअर बाजारात विक्रीचा सपाटा; सेन्सेक्स-निफ्टीत घसरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/01/15b0b143fb97df2f2b9fd433e889a0bf_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Share Market Closing Bell : आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा दिसून आला. आज सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरण दिसून आली. आज सकाळपासूनच शेअर बाजारात विक्रीचा जोर दिसून आला.
आज शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्समध्ये 111.01 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स निर्देशांक 52,907.93 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टीमध्ये 28 अंकांची घसरण झाली. निफ्टी 15,752.05 अंकावर स्थिरावला. आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला होता. त्यानंतर बाजार सावरला.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी सात शेअरमध्ये घसरण दिसून आली. रिलायन्सच्या शेअर दरात मोठी घसरण झाली. रिलायान्सच्या शेअर दरात 7.14 टक्क्यांची घसरण झाली. त्याशिवाय पॉवरग्रीड, भारती एअरटेल, एनटीपीसी, मारुती, डॉ. रेड्डीज आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात घसरण झाल्याचे दिसून आले.
आज आयटीसीच्या शेअर दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. त्याशिवाय, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, एचयूएल, एचडीएफसी, नेस्ले इंडिया, इंडसइंड बँक, टीसीएस, अल्ट्रा केमिकल, विप्रो, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, अॅक्सिस बँक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, कोटक बँक, टाटा स्टील, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक आदी कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली.
आज ऑइल अॅण्ड गॅस आणि ऑटो क्षेत्रात घसरण झाली. त्याशिवाय इतर सर्व सेक्टोरिअल इंडेक्समधील शेअर दर वधारले होते. आज बँक निफ्टी, वित्तीय सेवा, एफएमसीजी, आयटी, मीडिया, मेटल, फार्मा, पीएसयू बँक, खासगी बँकस रियल्टी, हेल्थकेअर आणि ग्राहकोपयोगी वस्तू आदी स्टॉक्सच्या शेअर दरात तेजी दिसून आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)