एक्स्प्लोर

Share Market Closing Bell: शेअर बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'; सेन्सेक्स 60 हजार अंकाखाली, 8.20 लाख कोटींचा चुराडा

Share Market Closing Bell: शेअर बाजारात आज आलेल्या सुनामीत 8.20 लाख कोटींचा चुराडा झाला.

Share Market Closing Bell: या आठवड्यातील व्यवहाराचा शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी (Indian Share Market) काळा दिवस ठरला. आज सकाळपासून सुरू झालेली घसरण कायम राहिल्याने हाहा:कार उडाला. गुंतवणूकदारांच्या चौफेर विक्रीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 60 हजार अंकांखाली आला असून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 18 हजार अंकांखाली घसरला. बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार रडकुंडीला आले. 

आज शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 980 अंकांच्या घसरणीसह 59,845 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी निर्देशांक 320 अंकांच्या घसरणीसह 17,806 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात आलेल्या सुनामीमुळे एकाच दिवसात 8.20 लाख कोटींचा चुराडा झाला. गुरुवारी बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा बीएसईवरील लिस्टेड कंपनीचा मार्केट कॅप 280.53 लाख कोटी रुपये होता. शुक्रवारी बाजारात झालेल्या घसरणीमुळे मार्केट कॅप 272.37  लाख कोटी इतका झाला. 

बाजारात आज आलेल्या सुनामीत सगळ्याच सेक्टरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला. बँकिंग सेक्टरमध्ये 1.75 टक्क्यांची घसरण दिसून आली. ऑटो सेक्टरमध्ये 2.54 टक्के, आयटी सेक्टरमध्ये 1.83 टक्के, पीएसयू बँकेच्या सेक्टरमध्ये 6.06 टक्के, एफएमसीजीमध्ये 1.71 टक्के, मेटल्समध्ये 4.47 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. एनर्जीस सेक्टरमध्ये 4.86 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.  

निफ्टी 50 मधील फक्त तीन कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. यामध्ये सिप्लामध्ये 0.24 टक्के, डिवीज् लॅबमध्ये 0.22 टक्के, टायटनच्या शेअर दरात 0.20 टक्क्यांची तेजी दिसून आली. 

कोरोना महासाथीच्या संकटाच्या सावटामुळे बाजारात विक्रीचा जोर दिसून आला. आज मिडकॅपमध्ये  मोठी घसरण दिसून आली. निफ्टी मिडकॅप इंडेक्समध्ये 3.76 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. 

शुक्रवारी, मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या 3655 कंपन्यांचे व्यवहार झाले. त्यातील फक्त 472 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 3115 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 68 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. 

जागतिक शेअर बाजारात झालेली (Indian Share Market) पडझड आणि कोरोना महासाथीची (Coronavirus) भीती याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. सकाळी, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 314 अंकांच्या घसरणीसह 60,512 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 91 अंकांच्या घसरणीसह 18036 अंकांवर खुला झाला. त्यानंतर बाजारात विक्रीचा जोर दिसून येत होता. सकाळच्या सत्रात फार्मा आणि हेल्थकेअर सेक्टरमध्ये तेजी दिसून आली होती. मात्र, त्यानंतरही त्यात विक्रीचा दबाव वाढू लागला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget