भारतीय लष्कराकडून तीन सैनिकांसह 7 पाकिस्तानींचा खात्मा, BAT टीमचा चौकीवर हल्ला करण्याचा डाव फसला
भारतीय लष्कराच्या फॉरवर्ड पोस्टवर हल्ला करण्याची योजना होती, असा दावा करण्यात येत आहे. भारतीय लष्कराला याची माहिती मिळाल्याने त्यांनी आगाऊ हल्ला करत हा कट उधळून लावला.

LoC Encounter at Krishna Ghati : भारतीय लष्कराने 7 पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले आहे. यामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या 3 जवानांचाही समावेश आहे. ही घटना 4 फेब्रुवारीच्या रात्री पूंछ जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्याजवळ घडली, जेव्हा नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय लष्कराच्या फॉरवर्ड पोस्टवर हल्ला करण्याची योजना होती, असा दावा करण्यात येत आहे. भारतीय लष्कराला याची माहिती मिळाल्याने त्यांनी आगाऊ हल्ला करत हा कट उधळून लावला. घुसखोरीदरम्यान ठार झालेल्या 7 जणांमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीमचे (BAT) 3-4 सदस्यांचा खात्मा झाला. हे पथक सीमापार ऑपरेशनमध्ये सक्रीय आहे. मात्र, या घटनेत 5 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये BAT संघातील सदस्यांचा उल्लेख नव्हता.
There are reports of 5-7 casualities in PoJK in the biggest loss for #PakistanArmy, Terrorists, and #BAT. Pakistan made a big attempt to infiltrate on Feb 4th night but the Indian army thwarted it. One of the casualities includes a Pak army captain. Pak 2 PoK commanders are still… pic.twitter.com/7P6cF03at8
— Manish Prasad (@manishindiatv) February 7, 2025
दहशतवादी अल्बद्र गटाचे असू शकतात
या कारवाईत मारले गेलेले दहशतवादी अल्बद्र गटाचे सदस्य असू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबतचे सर्व प्रश्न आम्ही चर्चेने सोडवू, असे सांगतानाच घुसखोरीचा हा प्रयत्न करण्यात आला आहे. एक दिवसापूर्वी पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले होते की, काश्मीर प्रश्न चर्चेने सोडवला जाईल.
भारतासोबतचे सर्व प्रश्न आम्ही चर्चेने सोडवू
घुसखोरीचा हा प्रयत्न अशावेळी करण्यात आला आहे, जेव्हा एक दिवस आधी ६ फेब्रुवारीला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबतचे सर्व प्रश्न आम्ही चर्चेने सोडवू असे सांगितले होते. त्यांच्या वक्तव्यानंतरच पाकिस्तान सरकारने जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाला पीओकेच्या रावळकोटमध्ये रॅली काढण्याची परवानगी दिली. ज्यामध्ये AK-47 आणि इतर शस्त्रे वाजवण्यात आली होती. रॅलीत भारतविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली, ज्यामध्ये हमासचे नेतेही उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या























