Year Ender 2022: सेन्सेक्स, निफ्टीने गाठला उच्चांक; 'या' शेअर्समध्ये घसरण, गुंतवणूकदारांना फटका
Year Ender 2022: सरत्या वर्षात शेअर बाजारात ऐतिहासिक उसळण दिसून आली असली तरी काही कंपन्यांच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला.
Year Ender 2022: सरत्या वर्षात भारतीय शेअर बाजाराने वाईट आणि चांगले दिवस पाहिले. जगभरातील शेअर बाजारात घसरण सुरू असताना दुसरीकडे भारतीय शेअर बाजाराने (Indian Share Market) चांगली कामगिरी केली. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) ऐतिहासिक उसळणही दिसून आली. एका बाजूला सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांक गाठला असताना दुसरीकडे काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून (Worst Performing Stocks in Year 2022) आली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला.
PayTm चा शेअर दर 76 टक्क्यांनी घसरला
वर्ष 2021 मधील नोव्हेंबर महिन्यात पेटीएमने 2150 रुपये प्रति शेअर इतका दर आयपीओत निश्चित करण्यात आला होता. शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर पेटीएमच्या शेअर दरात सातत्याने घसरण सुरू आहे. ही घसरण 2022 मध्येही थांबली नाही. आयपीओत 2150 रुपये किंमत असलेला शेअर हा 80 टक्क्यांनी घसरून 440 रुपयांपर्यंत आला. सध्या पेटीएमचा शेअर हा 480 ते 500 रुपयांदरम्यान व्यवहार करतोय.
Zomato च्या शेअर दरात घसरण
फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोची शेअर बाजारात दमदार एन्ट्री झाली. झोमॅटोच्या शेअर दराने 76 रुपयांहून 169 रुपयांपर्यंत मजल मारली होती. मात्र, त्यानंतर शेअर दरात घसरण सुरू झाली. झोमॅटोचा शेअर दर हा 40 रुपयांपर्यंत घसरला होता. झोमॅटो शेअर दर हा आयपीओ शेअर दरापेक्षा खाली आला असून 55 रुपयांवर आला आहे.
Nykaa कडून निराशा
झोमॅटो सारखीच स्थिती Nykaa कंपनीच्या शेअर दराची आहे. कंपनीने 1125 रुपये प्रति शेअर या दराने आयपीओ आणला होता. लिस्टिंगनंतर Nykaa चा शेअर दर 2500 रुपयांवर पोहचला होता. मात्र, 2022 नंतर कंपनीच्या शेअर दरात मोठी घसरण दिसून आली. कंपनीने गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली होती. बोनस शेअरनंतर Nykaa चा शेअर दर 151 रुपयांवर आला होता. मागील एक वर्षात Nykaa च्या शेअर दरात 55 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
Wipro ने केली निराशा
कोरोना काळात आयटी सेक्टरमध्ये तेजी दिसून आली होती. विप्रोच्या शेअर दराने 700 रुपयांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर सातत्याने शेअर दरात घसरण होत आहे. एका वर्षात गुंतवणूकदारांना 47 टक्क्यांचे नुकसान सहन करावे लागत आहे. विप्रोचा शेअर दर 379.70 रुपयांवर ट्रेड करत आहे.
Gland Pharma मध्ये घसरण
Gland Pharma ने लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. प्रति शेअर 1500 रुपये इतकी किंमत असणारा शेअर 4060 रुपयांपर्यंत पोहचला होता. त्यानंतर शेअर दरात मोठी घसरण दिसून आली. उच्चांकी दरापासून 60 टक्केहून अधिक घसरण झाली. सध्या शेअर 1600 रुपयांच्या आसपास ट्रेंड करत आहे.
Lux इंडस्ट्रीजच्या तेजीला ग्रहण
होजियरी कंपनी लक्स इंडस्ट्रीच्या शेअर दरात 2021 मध्ये तेजी दिसून आली. या वर्षाच्या सुरुवातीला प्रति शेअर दर 4000 रुपयांपर्यंत पोहचला होता. त्यानंतर शेअर दरात घसरण सुरू झाली. 2022 मध्ये आपल्या उच्चांकापासून हा शेअर दर 60 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.
IRCTC च्या शेअरकडून निराशा
IRCTC च्या शेअरने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. मात्र, सरत्या वर्षात आयआरसीटीसीच्या शेअर्सने निराशा केली. या वर्षात शेअर्सने 918 रुपयांचा उच्चांक गाठला होता. सध्या IRCTC चा शेअर 640 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता.
बजाज फायनान्सचा शेअर दर घसरला
बजाज फायनान्सनेदेखील गुंतवणूकदारांची निराशा केली. या वर्षात बजाज फायनान्सच्या शेअरने 8000 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर शेअर दरात घसरण झाली आहे. सध्या बजाज फायनान्सचा शेअर दर 6500 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत.