Adani : स्टेट बँकेकडून अदानींचे 12,770 कोटींचे कर्ज अंडरराइट; नवी मुंबई विमानतळासाठी घेतलं होतं कर्ज
SBI underwrites Adani Loan : स्टेट बँक ऑफ इंडियाने अदानी समुहाच्या अखत्यारीत असलेल्या 'नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड'चे कर्ज अंडरराइट केले आहे.
SBI underwrites Adani Loan : भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. अदानी समूहातील अदानी एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनीच्या उपक्रमाचा भाग असलेल्या 'नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड'चे (Navi Mumbai International Airport Private Ltd. (NMIAL)) 12,770 कोटी रुपयांचे कर्ज अंडरराइट केले आहे. स्टेट बँकेने NMIAL चे संपूर्ण 12,770 कोटी रुपयांचे कर्ज अंडरराइट केले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
एसबीआयने कर्ज अंडरराइट केल्याने अदानी समूहाने विमानतळ उभारणीसाठी घेतलेले सगळे कर्ज अंडरराइट झाले असल्याचे म्हटले आहे.
NMIALचे संचालक जीत अदानी यांनी सांगितले की, विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना सर्वोत्कृष्ट दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी कंपनी कटिबद्ध असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
भारतातील सर्वात मोठ्या शहरांना आणि त्याच्या सभोवती असणाऱ्या शहरांना स्पोक मॉडलमध्ये तयार करण्यावर आमचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये विमानतळ ही मुख्य भूमिका बजावणार आहेत. विमानतळ आणि विमानतळ वापरणाऱ्यांच्या समावेशासह एक आर्थिक परिसंस्था म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. एसबीआयने दिलेल्या या सहकार्यामुळे आम्ही मुंबईला आणखी चांगल्या सुविधा देण्याच्यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शेअर बाजारात अदानी समुहाच्या कंपन्यांचे शेअर तेजीत आहेत. अदानी विल्मरच्या शेअरने जवळपास 50 दिवसांत गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. दोन फेब्रुवारी महिन्यात अदानी विल्मर शेअर बाजारात लिस्ट झाला होता. अदानी पॉवर हा शेअरदेखील मागील काही दिवसांपासून तेजीत आहे. अदानी पॉवरच्या शेअरने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. अदानी पॉवरने 203 इतका दर गाठला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- ब्रिटनमध्ये टोमॅटो, काकडीचे दर कडाडले, एका काकडीसाठी मोजावे लागतात 42 रुपये
- LPG Price Hike : एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha