Rupee Vs Dollar: डॉलरच्या तुलनेत रुपया 20 पैशांनी घसरला, प्रति डॉलर 79.54 च्या खाली
Rupee Vs Dollar: आज सुरुवातीच्या व्यवहारात रुपयाची घसरण सुरू झाली, आज ट्रेडिंगच्या पहिल्या तासात 79.54 रुपयांपर्यंत खाली गेला
Rupee Vs Dollar : आज, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये (Indian Rupees) मोठी घसरण झाली आहे. तसेच त्यात 20 पैशांची घसरण पाहायला मिळाली. याच्या सुरुवातीच्या व्यवहारात रुपयाची हालचाल खूपच मंदावली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 20 पैशांनी घसरून 79.45 वर उघडला आहे, तर मागील ट्रेडिंग सत्रात म्हणजेच शुक्रवार, 5 ऑगस्ट रोजी तो 79.25 वर बंद झाला होता.
सुरुवातीच्या व्यवहारात रुपया 79.54 वर घसरला
आज सुरुवातीच्या व्यवहारात रुपयाची घसरण सुरू झाली, आज ट्रेडिंगच्या पहिल्या तासात 79.54 रुपयांपर्यंत खाली गेला आहे. आज रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 79.54 चा स्तर गाठला आहे, तर वरच्या दिशेने तो प्रति डॉलर 79.44 च्या पातळीवर गेला आहे.
चलन तज्ज्ञ काय म्हणतात?
चलन व्यापार्यांनी सांगितले की, विदेशी फंड्सच्या सततच्या आवकमुळे रुपयाची घसरण रोखण्यात मदत झाली, परंतु रुपयाची ट्रेडिंग सुरू होताच विक्री वाढली. दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शवणारा डॉलर निर्देशांक 0.05 टक्क्यांनी घसरून 106.57 वर आला.
क्रूड, FII आकडेवारी
ग्लोबल ऑईल बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.45 टक्क्यांनी वाढून $95.35 प्रति बॅरलवर व्यवहार करत होता. तर शेअर बाजाराच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी निव्वळ 1,605.81 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
आज बाजार कसा उघडला?
आजच्या व्यवहाराच्या सुरुवातीला, BSE 30-शेअर निर्देशांक सेन्सेक्स 29.78 अंकांच्या किंवा 0.051 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 58,417 वर उघडला. NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 4.00 अंकांच्या किंवा 0.023 टक्क्यांच्या वाढीसह 17,401.50 वर उघडला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये आज किती बदल? झटपट चेक करा आजचे लेटेस्ट दर
... अन् राकेश झुनझुनवालांच्या अकासा एअरचं पहिलं विमान आकाशात झेपावलं!