555 चा फॉर्म्युला वापरा, करोडपती व्हा; सविस्तर माहिती एका क्लिकवर
Retirement Planning: भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच त्याची तयारी सुरु करणं गरजेचं आहे. त्यासाठी योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक (Investment) करावी.
Retirement Planning: भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच त्याची तयारी सुरु करणं गरजेचं आहे. त्यासाठी योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक (Investment) करावी. दरम्यान, गुंतवणूक करताना आपल्याला परतावा किती मिळतो हे पाहणं देखील महत्वाचं असतं. दरम्यान, सेवानिवृत्तींतर आरामात जीवन जगण्यासाठी तुम्ही जर योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा मोठा फायदा मिळेल. यासाठी 555 चा फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरु शकतो.
प्रत्येकजण निवृत्तीच्या जीवनाबद्दल चिंतित आहे. निवृत्ती वेतनाच्या जवळपास अर्धा पगार मिळाल्याने खर्चाबाबत समस्या निर्माण होऊ शकतात. अशा स्थितीत निवृत्तीपूर्वी चांगले नियोजन करावे. जर तुम्ही लवकर बचत करायला सुरुवात केली तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता. निवृत्तीनंतर आनंदी जीवन जगू शकता. यासाठी 555 फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
काय आहे 555 फॉर्म्युला?
तुम्ही दर महिन्याला थोडी ठराविक रक्कम वाचवायला सुरुवात केली तर निवृत्तीनंतरचे आयुष्य खूप सोपे होईल. तुम्ही जर 555 फॉर्म्युल्याचा स्वीकार केला तर तुमचा मोठा फायदा होईल. या अंतर्गत, जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षापासून दरमहा 5000 रुपयांची बचत करण्यास सुरुवात केली, तर 30 वर्षांनंतर तुम्ही 55 वर्षांचे झाल्यावर तुमच्या हातात अंदाजे 2.64 कोटी रुपये असतील. निवृत्तीनंतर आरामदायी जीवन जगायचे असेल, तर 555 नियमांतर्गत दरमहा 5000 रुपये वाचवावे लागतील. या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) वर तुम्हाला सुमारे 12 टक्के वार्षिक परतावा मिळेल. ही SIP तुम्हाला 1.76 कोटी रुपयांच्या आकड्यावर घेऊन जाईल. तुम्हाला 2.64 कोटी रुपयांचा आकडा गाठायचा असेल, तर तुमची बचत दरवर्षी 5 टक्क्यांनी वाढवत रहा. अशाप्रकारे, 55 व्या वर्षापर्यंत 5000 रुपयांची बचत वार्षिक 5 टक्क्यांनी वाढवून 555 चा फॉर्म्युला बनतो, जो तुम्हाला करोडपती करेल.
तुम्ही 30 वर्षात अंदाजे 39.83 लाख रुपये जमा कराल. यावर तुम्हाला 2.23 कोटी रुपये व्याज मिळेल जर तुम्हाला वयाच्या 50 व्या वर्षी निवृत्त व्हायचे असेल तर ते करण्याचे तीन मार्ग आहेत. प्रथम, तुम्हाला तुमची मासिक SIP 5000 रुपयाने वाढवावी लागेल. दुसरे म्हणजे, ती दरवर्षी वाढवावी लागेल. तसेच, उच्च जोखीम घेऊन उच्च परतावा द्यावा लागेल.
महत्वाच्या बातम्या:
फक्त 20 रुपयांमध्ये 2 लाखांचा विमा, 18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात लाभ