Ratan Tata : ...आणि रतन टाटांनी अपमानाचा ‘गोड’ बदला घेतला! जॅग्वार आणि लँड रोव्हरची मालकी टाटा ग्रुपकडे आली त्याची गोष्ट
Ratan Tata : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी रात्री निधन झालं. टाटांनी उद्योगक्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही मोठं काम केलं.
मुंबई : भारतीय उद्योगजगताचे शिल्पकार आणि टाटा ग्रुपचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्या निधनावर देशभरातील सर्वसामान्यांपासून आर्थिक विश्वातील दिग्गजांनी दु: ख व्यक्त केलं आहे. रतन टाटा यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी गोष्टी अनेकांना माहिती आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रतन टाटा यांनी फोर्ड कंपनीच्या जॅग्वार आणि लँड रोव्हर कार निर्मितीचा विभाग खरेदी करत त्यांच्या झालेल्या अपमानाचा गोड बदला घेतला होता.
इंडिकाच्या सुरुवातीच्या तक्रारींमुळे टाटा मोटर्सला आर्थिक फटका बसला 1999 मध्ये टाटा ग्रुप प्रवासी वाहन निर्मिती विभाग विकण्याच्या निर्णयापर्यंत आला होता. प्रवासी वाहन निर्मिती विभाग विकण्यासाठी टाटांची फोर्डच्या बिल फोर्ड यांच्याशी बैठक निश्चित करण्यात आली होती. त्या काळी फोर्डकडे जॅग्वार आणि लँड रोव्हर या कंपन्या ताफ्यात होत्या अशात फोर्डला वाहन निर्मिती विभाग विकण्याचा निर्णय टाटा यांनी घेतला होता.
वाहन निर्मिती विभागाच्या विक्रीसंदर्भात बैठक सुरू असताना बिल फोर्ड यांच्याकडून रतन टाटांचा अपमान करण्यात आला होता. काहीच माहीत नसताना प्रवासी वाहन निर्मितीत हात टाकल्याबद्दल बिल फोर्डनं सवाल उपस्थित करत रतन टाटांचा अपमान केला होता.
या अपमानानंतर रतन टाटांनी वाहन निर्मिती विभाग सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आणि वाढवला. 2008 पर्यंत टाटांचा वाहन निर्मिती विभाग खूप मोठा झाला होता. त्याचवेळी 2008 च्या मंदीमुळे फोर्डला फटका बसला होता. फोर्ड कंपनीवर जॅग्वार आणि लँड रोव्हर या कंपन्या विकण्याची वेळ फोर्डवर आली होती.
अपमान करणाऱ्या बिल फोर्ड यांची भूमिका बदलली
जॅग्वार, लँड रोव्हर या अलिशान कार कंपन्या विकत घेण्यासाठी टाटांनी बिल फोर्ड यांना ऑफर दिली. रतन टाटांसोबतच्या बैठकीसाठी बिल फोर्ड अमेरिकेतून भारतात आले. दोघांमध्ये सविस्तर चर्चा पार पडली आणि डील यशस्वी झाली. रतन टाटांनी फोर्डकडून जॅग्वार, लँड रोव्हर या 2 कंपन्या २.३ अब्ज डाॅलर्सला विकत घेतल्या. या कंपन्या विकत घेत तुम्ही आमच्यावर उपकार केलेत अशी भावना त्यावेळी बिल फोर्ड यांनी टाटांसाठी व्यक्त केली होती. जॅग्वार, लँड रोव्हर या कंपनीच्या खरेदीमुळे टाटा आणि फोर्ड यांच्यातील व्यवहाराची जगभर चर्चा झाली होती. लँड रोव्हरच्या कार सध्या जगभरात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत आहेत.
इतर बातम्या :
Legendary Businessman Ratan Tata: टाटांच्या भेटीचा 'तो' दिवस!