एक्स्प्लोर

Legendary Businessman Ratan Tata: टाटांच्या भेटीचा 'तो' दिवस!

Legendary Businessman Ratan Tata: रतन टाटा (Ratan Tata) गेले, भारताच्या इतिहासातल्या उत्तुंग व्यक्तिमत्वांपैकी एक, ज्यांच्याबद्दल कोट्यवधी लोकांना प्रचंड आदर वाटतो असं ते व्यक्तिमत्व, ज्यांनी संपत्तीपुढे कायम देशाला स्थान दिलं असे उद्योजक, संपत्तीचा उपयोग केवळ दिखाव्यासाठी न करता समाजासाठी करणारा खरा समाजसेवक, त्यांच्या भेटीची आणि त्यांची मुलाखत घेण्याची ती अविस्मरणीय संधी मला मिळाली होती. तो आठवणीतला दिवस, त्या आठवणी...

2020 वर्ष सगळ्यांसाठी प्रचंड कठीण आणि मोठ्या प्रमाणात यातनादायक होतं. अर्थात छोट्या मोठ्या चांगल्या गोष्टी, घटना सर्वांच्याच आयुष्यात घडल्या असतील, तशा त्या माझ्याही आयुष्यात घडल्या. पण एक अशी भेट झाली की, ती या आयुष्यात विसरता येणार नाही. कोरोनाचं संकट आपल्यावर आदळण्याच्या अगदी काही दिवस आधी 'ती' आयुष्यात क्वचित मिळणारी अविस्मरणीय संधी चालून आली.  

'आपले भारतरत्न' ही माझावर 2020 याच वर्षी केलेली सिरीज, म्हणजे मला आजवरच्या नोकरीत करायला मिळालेल्या सर्वात चांगल्या कामांपैकी एक. आपल्या महाराष्ट्रातल्या 9 भारतरत्नांची माहिती महाराष्ट्राला देता येणं यापेक्षा मोठं भाग्य नाही... संगीतकार अजय अतुल पैकी एक असलेल्या अतुल गोगावलेंनी या कार्यक्रमाचं निवेदन करणं हा त्यातला एक खूप चांगला पैलू.


Legendary Businessman Ratan Tata: टाटांच्या भेटीचा 'तो' दिवस!

विनोबा भावे, महर्षी कर्वे, पां. वा. काणे, डॉ. आंबेडकर, आपल्या लाडक्या लतादीदी, असे एपिसोड करत करत उद्योग महर्षी जेआरडी टाटांच्या एपिसोडपर्यंत आमचं काम पोहोचलं... जानेवारी 2020 मध्ये भारतरत्नचं काम सुरू झाल्यापासूनच जेआरडी टाटांबद्दल रतन टाटांची मुलाखत मिळावी अशी इच्छा होती, त्यासाठी त्यांच्या ऑफिसचा मेल आयडी मिळवणं, त्यांना रितसर मेल पाठवणं असे प्रयत्न सुरू होते, पण कुठूनही रिस्पॉन्स असा येत नव्हता. आता देशातल्या इतक्या मोठ्या माणसापर्यंत पोचायचं कसं? हा प्रश्न होता. मालिकेतले बाकीचे भाग पूर्ण होत जेआरडी टाटांवर काम सुरू झालं, तेव्हा कुठल्याच बाबतीत आपली डॉक्युमेंटरी कमी पडायला नको, म्हणून जेआरडी टाटांच्या पहिल्या विमान प्रवासाचे व्हिडीयो चक्क फिल्म आर्काईव्हजमधून विकत आणून डॉक्युमेंटरीत वापरले. पण टेलिकास्टला दोन दिवस उरले तरीही काही रतन टाटांपर्यंत पोहोचता आलं नव्हतं. मग अचानक एक दिवस अतुलच्या नात्यातील एका व्यक्तीनं रमेशजी नावाच्या रतन टाटांचे स्नेही असलेल्यांचा नंबर दिला. त्यांना सगळा विषय समजावून सांगितल्यावर 14 तारखेला रात्री रतन टाटांकडून होकार आल्याचं रमेशजींनी कळवलं. ज्या दिवशी भारतरत्नच्या टाटांच्या एपिसोडचं टेलिकास्ट त्याच दिवशी म्हणजे, 15 मार्च 2020 लाच मुलाखत अशी ती घाई गडबड.

कुलाब्यातल्या शेवटच्या टोकाला रतन टाटांचं घर, तिथे मुलाखत होईल असंही रमेशजींनी कळवलं. कॅमेरा युनीट, कॅमेरामन वगैरे घेऊन मी ठरलेल्या वेळेच्या बरंच आधी मुलाखतीसाठी निघाले खरी, पण एवढा मोठा माणूस आपल्याला मुलाखत देणार यावर मनातून विश्वासच बसत नव्हता... रतन टाटांचं घर कुलाब्याच्या पार टोकाला अगदी समुद्राजवळ आहे. ते शोधत अगदी बाहेरच्या सिक्युरिटी बॉक्सलाच विचारपूस केली तर एबीपी माझाची टीम येणार हे त्यांना आधीपासूनच ठाऊक होतं, याचं किती सुखद आश्चर्य वाटलं. एरव्ही एखाद्या मोठ्या ठिकाणी जायचं म्हणजे, आधी बाहेरचे सिक्युरिटी गार्ड हुज्जत घालणार, मग आत दोन तीन वेळा फोन करुन विचारणार, ताटकळत तरी ठेवणार, असा अनुभव सगळ्या पत्रकारांना कायम येतो. पण इथे मात्र सगळ्यांना आमच्या येण्याची आधीपासूनच कल्पना होती आणि अत्यंत अगत्याने सगळे कर्मचारी बोलत होते. (अर्थात ते टाटांच्या घरचे कर्मचारी आहेत, त्यांनी वेगळं असणं अपेक्षितच आहे.)  घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर वेटींग एरियात थांबलो आम्ही, तर कुणीतरी म्हणाले एकदा दारावरची बेल वाजवा, रतन टाटा रेडी असतील तर लवकर मुलाखत करता येईल. कुणीतरी नोकर चाकर, कर्मचारीच दार उघडणार हे मनात निश्चित असल्यानं मी पटकन दारावरची बेल वाजवली, लगेच दार उघडलं गेलं, तर दार उघडणारे थेट रतन टाटाच! त्यांना प्रत्यक्षात बघतेय यावरच दोन मिनिटं विश्वास बसला नाही.

मी मुलाखत घ्यायला आलीय असं एका दमात सांगून टाकलं... त्यावर रतन टाटा म्हणाले... but you are little early, can you wait for sometime... हो हो म्हणत मी आपली अबाऊट टर्न घेऊन वेटींग एरियात येऊन बसले. साधारण 15 मिनिटांनी आम्हाला आत बोलावलं आणि तुमचा सेट अप करा असं सांगितलं... कॅमेरामन सेट अप लावत होते, तेव्हा टाटांचं घर आतून पाहताना माझा मात्र जीव दडपल्यासारखा होत होता. लॅव्हीशनेस आणि साधेपणाचा संगम वाटला मला त्या घरातलं इंटेरियर म्हणजे, एकाच वेळी भव्य दिव्य पण त्याचवेळी एक साधेपणाही.

देशातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतीचं घर न्याहाळत असताना  अचानक त्यांच्या घरातला मदतनीस म्हणाला लिफ्ट वाजली, म्हणजे साहेब आता येतायत खालती (सगळे मदतनीस मराठीच होते आणि मराठीतच बोलत होते.) रतन टाटा खरंच घरातल्या त्या लिफ्टनी खाली आले आणि सेट अप पाहून विचारु लागले त्यांनी कुठे बसायचंय. जेआरडी टाटांचा विषय सोडला तर इतर कुठलाच विषय नको, असंही त्यांनी सांगितलं पण ते ही सांगतांना बोलण्याचा टोन अगदी साधा आणि अदबीचा होता... मुलाखत सुरू झाली, दहा मिनिटंच घ्,या असंही त्यांनी मध्येच सांगितलं आणि मी मराठीत प्रस्तावना करू लागल्यावर थांबवलंच त्यांनी मला... पुन्हा विचारलं की, मी इंग्रजीत बोललं तर चालेल ना, (My heart sank when you started in Marathi, I am sorry but I cannot speak Marathi, is it ok if I answer in English) हे त्यांचे शब्द... नंतर मुलाखतीत कितीतरी आठवणी सांगितल्या रतन टाटांनी जेआरडींच्याबद्दल. एवढे मोठे उद्योजक पण पिक्चर बघायची लहर आल्यावर कसे तिकीटाच्या रांगेत उभं राहून तिकीट काढायचे, किंवा घरापासून टाटा हाऊसचं ऑफिस असा प्रवास करत असताना रस्त्यात दिसणाऱ्या व्यक्तींना लिफ्ट देत पुढे जाणारे जेआरडी आपली ओळख सांगणं मात्र कटाक्षाने टाळायचे. जेआरडी टाटांना भारतरत्न घोषित झालं तो क्षण अशी मस्त रंगली मुलाखत...

एरव्ही ऑफिसमध्ये कुणी सेलिब्रिटी वगैरे आले की, त्यांच्याबरोबर फोटो बिटो काढणं मी कटाक्षाने टाळते, का कोण जाणे पण नाही आवडत मला. कट्ट्यावरही कितीतरी मोठमोठे पाहुणे येतात पण मी क्वचितच फोटो काढते त्यांच्याबरोबर, पण रतन टाटा म्हणजे माझ्यासाठी साक्षात देवच समोर उभे होते. मुलाखतीनंतर आधी तर वाकून नमस्कार केला त्यांना आणि मग कॅमेरामनला सांगून त्यांच्याबरोबर फोटोही काढून घेतला. मी नमस्कार केल्याने ते फार संकोचून गेले असं मला नंतर वाटून गेलं.

मुलाखत झाल्यावर दोन्ही कॅमेरामननी सामान आवरायला घेतलं तर रतन टाटा आमच्याबरोबर उभेच. शेवटी पार संकोचून गेल्यानं मीच म्हंटलं की, Sir, please carry on we will leave now. पण रतन टाटा मात्र आम्हाला see off करण्यासाठी थांबले आणि आम्हाला बाय करुन मगच आता गेले. देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योजकाशी झालेली ही भेट मी कायम अभिमानाने मिरवणार एवढं नक्की.

रतन टाटांची मुलाखत मिळाल्याने भारतरत्नचा तो एपिसोड जोरदार झाला हे वेगळं सांगायलाच नको, कुठल्याही मराठी वृत्तवाहिनीवर रतन टाटा पहिल्यांदा दिसले त्या दिवशी, त्यामुळे केवळ एबीपी माझाच्याच नाही तर इतर सर्वच मराठी वाहिन्यांच्या न्यूजरुममध्ये तो चर्चेचा विषय ठरला. खरं तर ती मुलाखत घेण्याची संधी मिळाली याचं श्रेय संगीतकार अतुल आणि अर्थात अशी संधी देणाऱ्या माझ्या संपादकांचं.

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Full PC : शिंदेंनी सांगितला DCMचा फूलफॉर्म; शपथविधीनंतर पत्रकार परिषद गाजवलीDevendra Fadnavis Full PC :पवार - ठाकरेंचा उल्लेख, देवेंद्र फडणवीस यांची पहिलीच पत्रकार परिषद गाजवलीMahayuti UNCUT Oath : मी पुन्हा येणार म्हणत दोघांना घेऊन आले, भाऊ-भाई-दादांची शपथ!Raj Thackeray On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन #abpमाझा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Eknath Shinde : सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
सीएम आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला, पण शपथविधीला शिंदेंची 'देहबोली'च पुन्हा एकदा सर्वाधिक 'बोलली'!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM  : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Devendra Fadnavis take Oath as Maharashtra CM : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!
Embed widget