(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Petrol-Diesel Price Today: एका क्लिकवर पाहा आजचे पेट्रोल- डिझेलचे दर
मागील काही काळापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये झालेली वाढ सर्वसामान्यांच्या अडचणी आणखी वाढवत आहे. अ
Petrol-Diesel Price Today: मागील काही काळापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये झालेली वाढ सर्वसामान्यांच्या अडचणी आणखी वाढवत आहे. अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये झालेली वाढ नागरिकांची आर्थिक गणितं बिघडवत असतानाच यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी भर घातली आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरु असणाऱ्या इंधन दरवाढीमुळे देशातील बहुतांश ठिकाणी पेट्रोलच्या दरांनी शंभरीचा आकडा ओलांडला. आज, बुधवारी मात्र सरकारी तेल कंपन्यांकडून या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मे महिन्यामध्ये अवघ्या 17 दिवसांमध्ये पेट्रोल 4.17 रुपये आणि डिझेल 4.60 रुपये इतक्या फरकानं महागलं.
देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर (प्रती लीटर) किती ?
दिल्ली- पेट्रोल 94.49, डिझेल 85.38
मुंबई- पेट्रोल 100.72, डिझेल 92.69
चेन्नई- पेट्रोल 95.99, डिझेल 90.12
कोलकाता - पेट्रोल 94.50, डिझेल 88.23
बंगळुरु- पेट्रोल 97.64, डिझेल 90.51
चंदीगढ- पेट्रोल 90.89, डिझेल 85.04
कुठे आहेत भुवया उंचावणारे दर?
जयपूर - पेट्रोल 101.02, डिझेल 94.19
श्रीगंगानगर- पेट्रोल 105.52, डिझेल 98.32
रिवा- पेट्रोल 104. 82, डिझेल 95.95
दर दिवशी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पेट्रोल आणि डिझेलचे दर निर्धारित केले जातात. या दरांमध्ये एक्साईज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर सर्व दर जोडल्याने इंधनाच्या किंमती इतक्या वाढतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींच्या आधारे देशातील इंधनाचे दर निर्धारित होतात.
Cyclone tauktae : सरकारने केलेली आर्थिक मदत हास्यास्पद, मच्छिमारांची टीका; 15 जूनला आंदोलनाचा इशारा
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).