FD Interest Rate : SBI पासून HDFC पर्यंत, करबचत एफडीवर 'या' बँकाकडून सर्वाधिक व्याज
Tax Saving FD : ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक कर बचत एफडीवर 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत. या बँका खाजगी बँकांमध्ये सर्वोत्तम व्याजदर देतात.
FD Interest Rate : तुम्हीही आयकर स्लॅबमध्ये (Income Tax Slab) येत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जुन्या कर प्रणाली अंतर्गत, तुम्ही आयकराच्या विविध विभागांमध्ये गुंतवणूक (Investment) दाखवून करपात्र उत्पन्न कमी करू शकता. कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. 2023-24 आर्थिक वर्ष संपायला दोन महिने बाकी आहेत. यावेळी तुम्ही कर नियोजन लक्षात घेऊन गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होईल, नाहीतर तुम्हाला अधिक आयकर भरावा लागू शकतो.
करबचत करायचीय? मग येथे गुंतवणूक करा
बहुतेक कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीचा पुरावा सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. तुम्ही गुंतवणुकीचे पर्याय लक्षात घेऊन PPF, NPS, सुकन्या समृद्धी योजना (SSY), ELSS, PF किंवा विमा प्रीमियमद्वारे कर वाचवू शकता. कोणत्याही प्रकारची जोखीम टाळण्यासाठी, गुंतवणूकदार कर बचत एफडीमध्ये देखील गुंतवणूक करू शकतात. यावर मिळणारा व्याजदर इतर एफडीपेक्षा कमी आहे. बँका आणि त्यांचे व्याजदर जाणून घ्या.
स्टेट बँकेकडून 6.5 टक्के व्याज
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँका म्हणजेच भारतीय स्टेट बँक (SBI) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) करबचत एफडीवर 6.5 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. बँक ऑफ इंडिया (Bank of India) कर बचत एफडीवर 6 टक्के दराने व्याज देत आहे. जर तुम्ही येथे 1.5 लाख रुपये गुंतवले तर हे पैसे पाच वर्षांत 2.02 लाख रुपये होतील. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC), RBI ची उपकंपनी, 5 लाखांपर्यंतच्या FD वर गुंतवणुकीची हमी देते.
याशिवाय पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आणि युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank on India) करबचत एफडीवर 6.5 टक्के व्याज देत आहे. येथे 1.5 लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला पाच वर्षांत मॅच्युरिटीवर 2.07 लाख रुपये मिळतील. इंडियन बँक (Indian Bank) टॅक्स सेव्हिंग एफडीवर 6.25 टक्के व्याज देत आहे. या बँकेत 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक पाच वर्षांत 2.05 लाख रुपये होईल.
'या' बँकांमध्ये 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर
ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक कर बचत एफडीवर 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत. या बँका खाजगी बँकांमध्ये सर्वोत्तम व्याजदर देतात. जर तुम्ही येथे 1.5 लाख रुपये गुंतवले तर ते पाच वर्षांत 2.12 लाख रुपये होईल. कॅनरा बँक कर बचत एफडीवर 6.7 टक्के पर्यंत व्याज देत आहे. ही बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वोत्तम व्याज देत आहे. जर तुम्ही येथे 1.5 लाख रुपये गुंतवले तर, ते पाच वर्षांत 2.09 लाख रुपये होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :