Best FD Scheme : भरघोस व्याज देणाऱ्या 3 स्पेशल FD योजना! गुंतवणूक करण्याची शेवटची संधी, 31 डिसेंबरपर्यंत मुदत
Special FD Scheme : जास्त व्याज देणाऱ्या तीन खास एफडी योजना 31 डिसेंबर रोजी संपत आहेत, गुंतवणूक करण्याची शेवटची संधी आहे.
![Best FD Scheme : भरघोस व्याज देणाऱ्या 3 स्पेशल FD योजना! गुंतवणूक करण्याची शेवटची संधी, 31 डिसेंबरपर्यंत मुदत bank special fd scheme with higher interest list deadline ends at 31 december 2023 SBI IDBI indian bank know all details marathi news Best FD Scheme : भरघोस व्याज देणाऱ्या 3 स्पेशल FD योजना! गुंतवणूक करण्याची शेवटची संधी, 31 डिसेंबरपर्यंत मुदत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/05/741daae94f891e3087bdeb5b5529ef4d1699166189640685_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Best FD Scheme : बँका (Bank) ग्राहकांसाठी विविध योजना आणतात. विविध बँका खास योजना आणून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. काही बँकांकडून धमाकेदार मुदत ठेव (Fixed Deposit) योजना लाँच करण्यात आल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला भरघोस व्याज कामवण्याची संधी (FD Interest Rate) आहे. बँकांच्या मुदत ठेव (Bank FD Scheme) योजना सुरक्षितेची हमी आणि परतावा मिळणारी गुंतवणूक योजना आहे. बहुतेक लोक एफडी योजनेत (FD Scheme) पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात. देशातील तीन बँकांनी विशेष एफडी योजना ऑफर केल्या आहे. महत्त्वाचं म्हणजे या योजनांची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 ला संपत आहे. त्यामुळे या खास मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची तुमच्याकडे शेवटची संधी आहे.
तीन बँकांच्या खास मुदत ठेव योजना
भारतीय स्टेट बँक (State Bank of India), आयडीबीआय बँक (IDBI Bank) आणि इंडियन बैंक (Indian Bank) या तीन बँकांकडून खास मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या एफडी योजनांबाबत अधिक माहिती जाणून घ्या.
SBI Amrit Kalash Scheme : एसबीआय अमृत कलश योजना
स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी SBI अमृत कलश योजना आणली आहे. ही 400 दिवसांची विशेष मुदत ठेव (FD) योजना आहे. यामध्ये सर्वसामान्य ग्राहकांना 7.10 टक्के एफडी व्याजदराचा (FD Interest Rate) लाभ मिळत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) या कालावधीत 7.60 टक्के एफडी व्याजदर (FD Interest Rate) मिळत आहे. या योजनेची अंतिम मुदत (SBI Amrit Kalash Scheme Last Date) 31 डिसेंबर 2023 रोजी संपत आहे. जर तुम्ही देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही SBI बँकेच्या शाखेत जाऊन किंवा SBI YONO द्वारे गुंतवणूक करू शकता.
IDBI Bank Special FD Scheme : आयडीबीआय बँक विशेष FD योजना
आयडीबीआय बँकेच्या 'उत्सव FD' अंतर्गत, 375 आणि 444 दिवसांच्या विशेष FD वर मजबूत व्याजदर दिले जात आहेत. 375 दिवसांच्या विशेष एफडीवर सामान्य नागरिकांना 7.10 टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) 7.60 टक्के व्याजदर मिळत आहे. तर 444 दिवसांच्या FD वर सर्वसामान्य नागरिकांना 7.25 टक्के व्याजदराचा तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. तुम्ही या एफडीमध्ये 31 डिसेंबर 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता.
Indian Bank Special FD Scheme : इंडियन बँक स्पेशल एफडी योजना
इंडियन बँक ग्राहकांना 400 दिवसांची विशेष FD योजना देखील देत आहे. या योजनेअंतर्गत सर्वसामान्य ग्राहकांना 7.25 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) 7.75 टक्के आणि सुपर ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के व्याजदर (FD Interest Rate) दिला जात आहे. जर तुम्हाला इंडियन बँकेच्या या विशेष एफडीचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे 31 डिसेंबर 2023 पर्यंत वेळ आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)