Old Coin : : छंद म्हणून सांभाळून ठेवलेलं 25 पैशाचं नाणं तुम्हाला लखपती बनवेल, कसं?
जर तुमच्याकडे असे नाणे असेल आणि तुम्हाला ते विकायचे असेल तर आधी तुम्हाला Quikr वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल.
![Old Coin : : छंद म्हणून सांभाळून ठेवलेलं 25 पैशाचं नाणं तुम्हाला लखपती बनवेल, कसं? Old Coin, Your 25 paise coin will make you a millionaire, how? Old Coin : : छंद म्हणून सांभाळून ठेवलेलं 25 पैशाचं नाणं तुम्हाला लखपती बनवेल, कसं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/09/b6ddd76d31ba0230e2c9d6cfe32d8682_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : जर तुम्हाला नाणी किंवा नोटा गोळा करण्याची आवड असेल तर हा छंद तुम्हाला लखपती किंवा करोडपती बनवू शकतो. बऱ्याच वेळा, जुनी नाणी सांभाळून ठेवल्याने त्याचे मूल्य नंतर खुप वाढतं. ज्यात तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. आताच्या ऑनलाईन शॉपिंगच्या युगात तर सहज शक्य आहेत. त्यामुळे अनेकांनी छंद म्हणून सांभाळून ठेवलेल्या नोटा किंवा नाणी आज त्यांच्यासाठी लाखो रुपयांची संपत्ती बनले आहेत.
जर तुमच्याकडे 25 पैशांचं नाणं असेल तर तुम्ही ते ऑनलाइन मार्केटमध्ये विकू शकता. मीडिया रिपोर्टनुसार, या नाण्याची किंमत 1.50 लाख रुपयांपर्यंत आहे. वास्तविक, क्विकर (Quickr) वेबसाईटवर, या विशिष्ट प्रकारच्या नाण्याची किंमत लाखो रुपयांमध्ये ठेवण्यात आली आहे.
तुमच्या खिशातील '786' नंबरची नोट तुम्हाला बनवेल लखपती, कसं?
25 पैशांचे हे नाणे कसे विकायचे?
जर तुमच्याकडे असे नाणे असेल आणि तुम्हाला ते विकायचे असेल तर आधी तुम्हाला Quikr वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्ही तुमचे नाणे पेमेंट आणि डिलिव्हरीच्या अटींनुसार विकू शकता. यासह, आपण या वेबसाईटवर बार्गेनिंग देखील करू शकता. जुन्या नाण्यांसाठी आणि नोटांसाठी इंडियामार्ट डॉट कॉम (indiamart.com) वरही बोली लावली जाते.
Old Note, Coin : एक रुपयाची जुनी नोट तुम्हाला बनवू शकते लखपती; कसं? वाचा सविस्तर
5 पैसे आणि 10 पैशांच्या नाण्यांसाठीही बोली घेतली जाते
तुमच्याकडे 5 पैसे आणि 10 पैशांची नाणी असली तरीही तुम्ही त्यांना विकून पैसे कमवू शकता. परंतु, या नाण्यांसाठी एक अट आहे की आपल्याकडे अशी नाणी असावी ज्यात माँ वैष्णो देवीचे चित्र असेल आणि ते 2002 मध्ये जारी केलेले असावे. अशी नाणी विकून देखील तुम्ही पैसे कमवू शकता. Ebay, कॉईनबाजार, इंडियन ओल्ड कॉईन आणि क्लिक इंडिया यासारख्या साईट्सवर लोक या नोटा, नाणी शोधत असतात. अशा नोटा आणि नाण्यांची बोली देखील लावली जाते.
जुन्या नोटा किंवा नाणी कुठे विकायचे?
- आधी www.ebay.com या साईटवर क्लिक करा.
- होमपेजवर रजिस्टर करण्यासाठी क्लिक करा आणि सेलर म्हणून स्वत:चं रजिस्ट्रेशन करा.
- आपल्या नोटेचा एक छान फोटो काढा आणि साईटवर अपलोड करा. जुन्या नोटा आणि नाणी खरेदी करण्यासाठी अनेक लोक या प्लॅटफॉर्मचा वापर करतात.
- नोट खरेदी करण्यास इच्छुक असलेले लोक आपली माहिती पाहतील आणि आपल्याशी संपर्क साधतील. आपण त्यांच्याशी बोलून आपली नोट विकू शकता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)