एक्स्प्लोर

Foreign Exchange : परकीय चलनात सलग नवव्या आठवड्यात घट; जाणून घ्या सोन्याचा साठा किती शिल्लक?

Foreign Exchange Recline : देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात सलग नवव्या आठवड्यात घट झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आकडेवारीत जाहीर करत यासंबंधीची सविस्तर माहिती दिली आहे.

Foreign Exchange Recline : देशाच्या परकीय चलनाच्या (Foreign Exchange) साठ्यात सलग नवव्या आठवड्यात घट झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI - Reserve Bank of India) आकडेवारीत जाहीर करत यासंबंधीची सविस्तर माहिती दिली आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात 4.854 अब्जने घसरून 532.664 अब्ज झाले. 

23 सप्टेंबर रोजी संपलेल्या मागील आठवड्यात परकीय चलन साठा 8.134 अब्ज डॉलरने घसरून 537.518 अब्ज इतका झाला होता. 16 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात हाच साठा 5.219 अब्ज डॉलरने घसरून 545.652 अब्ज झाला. ऑक्टोबर 2021 मध्ये देशाच्या परकीय चलनाचा साठा 645 अब्ज इतका सर्वकालीन उच्चांक गाठला होता. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

आरबीआयने जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्यातील ही घसरण मुख्यत्वे विदेशी चलन मालमत्तेमध्ये  (Foreign Currency Assets) घट झाल्यामुळे झाली, जी मालमत्ता एकूण चलन साठ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. याबाबत माहिती देताना रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे की, अहवालाच्या आठवड्यात भारताचा विदेशी चलन मालमत्ता (FCA ) 4.406 अब्ज डॉलरने घसरून 472.807 अब्ज झाला आहे. डॉलरमध्ये नामांकित, FCAs मध्ये परकीय चलनाच्या साठ्यामध्ये असलेल्या युरो, पौंड आणि येन सारख्या इतर विदेशी चलनांच्या मूल्यात वाढ किंवा घट होण्याचा परिणाम देखील समाविष्ट असतो.

सोन्याचा साठाही कमी झाला

याशिवाय गेल्या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 281 दशलक्षने घसरून 37605 अब्ज झालं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मध्ये देशाचा SDR (स्पेशल ड्रॉइंग राइट्स) 167 दशलक्षने घसरून 17.427 अब्ज झाला. रिपोर्टिंग आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मधील देशाची राखीव स्थिती  4.826  US अब्ज डॉलरवर अपरिवर्तित राहिली.

महत्त्वाच्या इतर बातम्या

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rajputana Biodiesel : राजपुताना बायोडिझेलच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी, नेमकं कारण काय?
राजपुताना बायोडिझेलच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी, नेमकं कारण काय?
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on PM Modi: 'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल
'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्लाबोल
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
Embed widget