बँक खात्यावर 200 रुपये येतात अन् होते हजारोंची लूट, नवा स्कॅम आहे तरी काय? कशी काळजी घ्याल?
सध्या देशात नव्या प्रकारचा ऑनलाईन फ्रॉड केला जात आहे. या फ्रॉडच्या मादतीने लोकांची हजारो रुपयांना लूट केली जात आहे.
मुंबई : आज यूपीआय तंत्रज्ञानामुळे बँकेचे, पैशांचे व्यवहार करणे फारच सोपे झाले आहे. अगोदर पैशांचा व्यवहार करायचा म्हटलं की कित्येक तास जायचे. पण आता यूपीआयच्या माध्यमातून अवघ्या काही सेकंदांत तुम्ही पैशांचे व्यवहार करू शकता. हे सर्वकाही तंत्रज्ञानामुळे शक्य झालं आहे. मात्र याच तंत्रज्ञानामुळे गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. दरम्यान, आता अशाच प्रकारे 20 हजार रुपयांचा एक नवा फ्रॉड समोर आला आहे. लोकांना 20 हजार रुपयांना फसवले जात आहे.
नेमका फ्रॉड काय आहे?
आजकाल यूपीआयच्या मदतीने 20 हजा रुपयांचा फ्रॉड केला जातोय. सामान्य लोकांना लुटले जात आहे. अशा प्रकारची लूट करण्यासाठी वेगळ्या प्रकारची शक्कल लढवली जात आहे. ही लूट करण्यासाठी तुम्हाला अगोदर यूपीआयच्या माध्यमातून 200 रुपये पाठवले जातात. एका अनोळख्या मोबाईल क्रमांकाच्या मदतीने हे पैसे पाठवले जातात. त्यानंतर तुम्हाला एक कॉल येतो. या कॉलमध्ये समोरची व्यक्ती माझ्याकडून तुमच्या खात्यावर चुकून 20 हजा रुपये ट्रान्सफर झाले आहेत, असे सांगतो. समोरच्या व्यक्तीने पाठवलेल्या 200 रुपयांना तुम्ही चुकून 20,000 वाचले तर तुम्ही लगेच त्या व्यक्तीला 20000 रुपये परत करता. म्हणजेच तुमच्या खात्यावर 200 रुपये आलेले असतात, पण तुम्ही गोंधळात पडून समोरच्या व्यक्तीला 20000 रुपये पाठवता. या व्यवहारात समोरच्या व्यक्तीचे 200 रुपये ट्रान्सफर करण्याच्या प्रयत्न तुमचे 19,800 रुपयांचे नुकसान होते.
शक्यतो दिवसा येतो कॉल
अशा प्रकारची फसवणू करण्यासाठी स्कॅमर्स शक्यतो दिवसा कॉल करतात. कारण दिवसा लोक कामात असतात. कामाच्या गडबडीत लोक 200.00 रुपयांना 20000 रुपये वाचण्याची शक्यता आहे. त्यामुळे समोरचे स्कॅमर्स हे दिवसाच कॉल करतात.
नेमकी काय काळजी घ्यावी?
अशा प्रकारचा कॉल आल्यास प्रथमत: घाबरून जाऊ नये. तुमच्या बँक खात्यात नेमके किती रुपये आले आहेत, हे तपासावे. त्यानंतर जेवढे पैसे तुम्हाला आलेले आहेत, तेवढेच पैसे परत करावेत.
डिजिटल फ्रॉडमध्ये 700 टक्क्यांची वाढ
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून डिजिटल घोटाळ्यांची संख्या वाढली आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या (RBI) माहितीनुसा देशात डिजिटल फ्रॉडच्या संख्येत 700 टक्क्यांची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये अशा प्रकारच्या फ्रॉडची संख्या 9,046 होती, हीच संख्या 2023-24 मध्ये 36,075 प्रर्यंत वाढली आहे.
हेही वाचा :
HDFC बँकेची ऑनलाईन सेवा 'या' दोन दिवसांसाठी राहणार बंद, नेमकं कारण काय?
पंतप्रधानांसह राष्ट्रपती खासदारांना किती मिळतो पगार? कोणत्या आहेत सुविधा? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Gold Silver Rate : अवघ्या 12 तासांत सोन्याच्या दरात 1200 रुपयांनी घट, नेमकं कारण काय?