HDFC बँकेची ऑनलाईन सेवा 'या' दोन दिवसांसाठी राहणार बंद, नेमकं कारण काय?
एचडीएफसी बँकेच्या ऑनलाईन व्यवहारावर काही काळासाठी निर्बंध येणार आहेत. सिस्टिम अपग्रेड करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे.
मुंबई : तुम्ही एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. सध्या विक एंड असताना एचडीएफसी बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती बँकेने खातेदारांना एसएमएस आणि ई-मेलच्या माध्यमातून दिली आहे. या मेलनुसार बँकेची ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंग सर्व्हिस दोन दिवस काम करणार नाही. दोन दिवसांतील आजचा एक दिवस संपला आहे. पण आणखी एक दिवस बँकेच्या या सेवा वापरता येणार नाहीत.
अनेक व्यवहारावर निर्बंध
मिळालेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँकेच्या मोबाईल आणि नेटबँकिंगच्या अॅपवर 9 जून आणि 16 जून रोजी काही ट्रान्झिशन्स होणार नाहीत. 9 जून रोजी सकाळी 3:30 ते सकाळी 6:30 दरम्यान ग्राहकांना हे ट्रान्झिशन करता येणार नव्हते. आता मात्र हे ट्रान्झिशन्स सुरळीत झाले आहेत. पण 16 जून रोजी सकाळी 3:30 ते सकाळी 7:30 नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंच्या व्यवहारावर निर्बंध असतील.
या सेवांचा नागरिकांना घेता येणार नाही लाभ
एचडीएफसी बँकेच्या संकेतस्थळानुसार अकाउंट, डिपॉझिट्स, फंड ट्रान्सफर (NEFT, IMPS, RTGS आणि बँक ट्रान्सफर), ऑनलाइन पेमेंट अशा प्रकारचे ट्रान्झिशन्स 9 आणि 16 जून 2024 रोजी सकाळी 03:30 ते सकाळी 06:30 वाजेपर्यंत या सुविधा वापरता येणार नाहीत. या काळात बँकेचे ग्राहक यूपीएयच्या माध्यमातूनदेखील पेमेन्ट करू शकणार नाहीत. चांगली गोष्ट म्हणजे यातील 9 जून हा दिवस आता संपला आहे. पण आगामी 16 जूनचा विचार करता ग्राहकांनी त्यांची ऑनलाईन बँकिंगचे काम आताच करून घ्यावे, असे आवाहन केले जात आहे.
याआधीही व्यवहारासाठी आले होते निर्बंध
याआधीही एचडीएफसी बँकेने ग्राहकांना ऑनलाईन बँकिंगचा अनुभव अधिक सुखरकर आणि सुलभ व्हावा यासाठी अपग्रेडेशनच्या कामासाठी ऑनलाईन व्यवहारावर निर्बंध आणले होते. या अपग्रेडेशनच्या प्रक्रियेत एचडीएफसी बँकेच्या डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड सेवेत सुधारणा करण्यात आली होती. तेव्हा 4 जून रोजी रात्री 12.30 ते 2.30 वाजता डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड्सची सिस्टिम अपग्रेडिंगसाठी शेड्यूल करण्यात आली होती. या काळात नागरिकांना एटीएमवरून पैसे काढता येत नव्हते. तसेच पीओएस आणि नेटसेफ ट्रोन्झेक्शन थांबवण्यात आले होते.
हेही वाचा :
Gold Silver Rate : अवघ्या 12 तासांत सोन्याच्या दरात 1200 रुपयांनी घट, नेमकं कारण काय?
NHAI Toll : देशात लवकरच उपग्रह आधारित इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली लागू होणार
नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय, 2 महिन्यातच ऑनलाईन आंबा विक्रीतून शेतकरी लखपती