एक्स्प्लोर
IPO Update : एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा तगडा प्रतिसाद, 89 पट सबस्क्राइब,GMP किती?
IPO Update : आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा नव्यानं येणाऱ्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सच्या आयपीओला 89 पट सबस्क्राइब करण्यात आलं आहे.
एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सच्या
1/5

एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सच्या आयपीओच्या लॉटसाठी बोली लावण्याची मुदत आज संपली. एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सच्या आयपीओला 89.90 पट सब्रस्क्राइब करण्यात आलं आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 101 शेअर आहेत, एका शेअरचं मूल्य किमान 140 रुपये ते 148 रुपये असं आहे.
2/5

नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील आकडेवारीनुसार एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सच्या आयपीओद्वारे 3,07,93,600 शेअर जारी केले जाणार आहेत. मात्र, 2,76,83,13,747 शेअरसाठी बोली लागली आहे. इनवेस्टरगेनच्या अंदाजानुसार जीएमपी प्रति शेअर 196 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गुंतवणूकदारांना जीएमपीनुसार आयपीओ लिस्टींग झाल्यास 32 टक्के परतावा मिळू शकतो.
Published at : 26 Nov 2024 10:27 PM (IST)
आणखी पाहा























