एक्स्प्लोर

पंतप्रधानांसह राष्ट्रपती खासदारांना किती मिळतो पगार? कोणत्या आहेत सुविधा? सविस्तर माहिती एका क्लिकवर

देशाच्या पंतप्रधानांना नेमका पगार (PM Salary) किती असतो? किंवा राष्ट्रपती, खासदार यांना पगार किती असतो? पाहुयात याबाबतची सविस्तर माहिती.

PM Salary News: भारताच्या (India) दृष्टीनं आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण आज नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक कॅबिनेट मंत्री देखील शपथ घेणार आहेत. दरम्यान, तुम्हाला हे माहित आहे का, की देशाच्या पंतप्रधानांना नेमका पगार (PM Salary) किती असतो? किंवा राष्ट्रपती, खासदार यांना पगार किती असतो? या पदावरील व्यक्तिंना नेमक्या कोणत्या सुविधा असतात? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.

पंतप्रधान हे सर्वात महत्वाचे पद

भारताच्या लोकशाही व्यवस्थेत पंतप्रधान हे सर्वात महत्वाचे पद आहे. पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रीमंडळ देशाच्या संबंधित असणारे सर्व निर्णय घेतात. अनेकांना पंतप्रधानांची सर्व कामे माहित असतात. पण, पंतप्रधानांना मिळणारा पगार आणि सुविधा याबाबत सर्वांनाच माहिती नसते. आज आपण पंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांना मिळणारे वेतन, भत्ते आणि इतर सुविधांबद्दल माहिती पाहणार आहोत. 

पंतप्रधानांना किती पगार आणि इतर सुविधा काय? 

भारतात पंतप्रधानांचे वेतन दरमहा 1.66 लाख रुपये आहे. यामध्ये मूळ वेतन 50,000 रुपये आहे. तर खर्च भत्ता 3,000 रुपये, संसदीय भत्ता 45,000 रुपये आणि 2,000 रुपये दैनिक भत्ता यांचा समावेश आहे. तर पंतप्रधानांना अनेक प्रकारच्या सरकारी सुविधा असतात. यामध्ये अधिकृत सरकारी निवासस्थान, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) सुरक्षा, सरकारी वाहने आणि विमानांची सुविधा, आंतरराष्ट्रीय सहलींसाठी सरकारकडून भाडे, निवास आणि जेवणाचा खर्च देखील मिळतो. भारतात पंतप्रधान झालेल्यांना निवृत्तीनंतरही अनेक सुविधा मिळतात. या सुविधांपैकी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे माजी पंतप्रधानांना या कालावधीत पाच वर्षांसाठी मोफत सरकारी घर, वीज, पाणी आणि एसपीजीची सुविधाही मिळते.

राष्ट्रपतींना किती पगार आणि सुविधा काय? 

भारताच्या राष्ट्रपतींनाही अनेक अधिकार असतात. राष्ट्रपती हे भारतीय लोकशाहीतील अत्यंत महत्वाचे पद आहे. भारतात राष्ट्रपतींना दरमहा 5 लाख रुपये पगार मिळतो. याशिवाय, त्यांना अनेक करमुक्त भत्ते देखील मिळतात. ज्यात जगभरातील ट्रेन आणि विमानाने मोफत प्रवास, मोफत घर, वैद्यकीय सेवा आणि कार्यालयीन खर्चासाठी वार्षिक 1 लाख रुपये मिळतात. माजी राष्ट्रपतींना दरमहा दीड लाख रुपये पेन्शन, सरकारी घर, दोन मोफत लँडलाइन फोन, एक मोबाइल फोन आणि पाच वैयक्तिक कर्मचाऱ्यांची सुविधाही मिळते.

खासदारांना किती मिळतो पगार?  

भारतातील एका खासदाराला दरमहा 1 लाख रुपये पगार मिळतो. याशिवाय दैनंदिन भत्ताही मिळतो, जो दर पाच वर्षांनी वाढतो. भारतातील कोणत्याही खासदाराला संसदेची अधिवेशने, समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी दररोज 2,000 रुपये आणि प्रवासासाठी प्रति किलोमीटर 16 रुपये या प्रमाणे प्रवास भत्ता मिळतो. याशिवाय खासदारांना दरमहा 45,000 रुपये मतदारसंघ भत्ता आणि 45,000 रुपये कार्यालयीन खर्च भत्ता देखील मिळतो, ज्यामध्ये स्टेशनरी आणि टपालासाठी 15,000 रुपये समाविष्ट आहेत.

खासदाराला मिळतात 'या' सुविधा

पगाराव्यतिरिक्त, खासदाराला कुटुंबासाठी मोफत वैद्यकीय सुविधा, सरकारी निवास, स्वतःसाठी आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांसाठी दरवर्षी 34 मोफत देशांतर्गत विमान प्रवास देखील मिळतो. त्यांना ट्रेनमध्ये मोफत फर्स्ट क्लास ट्रेन प्रवासाची सुविधाही मिळते.

महत्वाच्या बातम्या:

महिना 25000 पगार असूनही तुम्ही करोडपती होऊ शकता, नेमकं कसं कराल नियोजन? सविस्तर माहिती एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
Embed widget