Gold Silver Rate : अवघ्या 12 तासांत सोन्याच्या दरात 1200 रुपयांनी घट, नेमकं कारण काय?
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पहाययला मिळतोय. सध्या मात्र अवघ्या 12 तासांत सोन्याचा दर 1200 रुपयांनी कमी झाला आहे.
मुंबई : बारा तासांत सोन्याच्या दरात तब्बल अठराशे रुपयांची घसरण झाल्याने सोने खरेदीसाठी वाट पहात असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्याभरापासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊन हा दर जीएसटीसह 76500 रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचला होता.परिणामी सर्वसामान्याला सोने खरेद करणे अशक्य होऊन बससे होते.
सोने दरवाढीचे नेमके कारण काय?
गेल्या काही दिवसांपासून जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्याचा परिणाण सोन्याच्या दरावर होत आहे. जागतिक पातळीवर मागील काळात चायनासह इतर अनेक देशांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या खरेदीला प्राधान्य देण्यात आलं. त्याचादेखील परिणाम म्हणून गेल्या काही दिवासांत सोन्याच्या दरांत चढ-उतार पाहायला मिळतोय. इतर देशांप्रमाणे भारतदेखील सोन्याच्या खरेदीला प्राधान्य देत आहे. त्याचाच एकंदरीत परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांत सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचला होता.
चीनकडून सोने खरेदी थांबवण्यात आली
मात्र आता अवध्या बारा तासांत सोन्याच्या दरात तब्बल अठराशे रुपयांची घसरण झाली आहे. याच कारणामुळे दागिन्यांच्या रुपात सोन्याची खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनकडून सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात होती. आता मात्र चीनने ही खरेदी अनाचक थांबवली आहे. त्यामुळेच सोन्याच्या दरात 1200 रुपयांची घसरण झाली आहे.
दरम्यान, आता सोन्याचा दर कमी झाल्यामुळे ग्रहकांनी आपला मोर्चा सराफा बाजारकडे वळवला आहे. लोक सोन्याच्या रुपात लैशांची गुंतवणूक करत आहेत. दागिन्यांसाठी पैसे देत आहेत.
हेही वाचा :
मोठी बातमी! नारायण राणे, भागवत कराड यांचा पत्ता कट, मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही
दिल्लीतून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन, महाराष्ट्राला आणखी एक मंत्रिपद मिळणार?