एक्स्प्लोर

New Rules from 1st September : आजपासून आर्थिक व्यवहार आणि नियमांत मोठे बदल, जाणून घ्या काय

New Rules from 1st September : आजपासून आर्थिक व्यवहार आणि नियमांत मोठे बदल होणार आहेत. पण हे बदल नेमके कोणते, जाणून घ्या.

New Rules from 1st September : आजपासून 2021 वर्षातील नवव्या महिन्याला सुरुवात होत आहे. आज एक सप्टेंबर आजपासून दैनंदिन जीवनाशी निगडीत आर्थिक व्यवहारांत बदल होणार आहेत. तसेच काही नवे नियमही लागू होणार आहेत. हे बदल  जीएसटी रिटर्न, PF UAN शी आधार लिकिंग, राजधानी ट्रेन आणि काही बँकांच्या व्यवहारांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. तसं पाहता हे सर्व नियम सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत. जाणून घेऊया या नियमांबाबत... 

आजपासून जीएसटी रिटर्नसाठी नवा नियम 

जीएसटी कलेक्शनमध्ये  झालेली घट पाहता, सरकारनं उशिरा कर भरणाऱ्यांवर कडक दंड आकरण्याची तयारी केली आहे. सरकार जीएसटी धारकांनी  GST भरण्यास विलंब केल्यास 1  सप्टेंबरपासून निव्वळ करावर व्याज आकारणार आहे. यासोबतच वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भरण्यास उशीर केल्यास त्यावरील एकूण कर दायित्वावर व्याज आकारलं जाणार असल्याचं सांगितलं आहे. 

या वर्षाच्या सुरुवातीला, अनेक उद्योगांनी जीएसटी भरण्यास विलंब केल्यानं तब्बल 46,000 कोटी रुपयांचं थकीत व्याज वसूल करण्याच्या दिशेनं व्यक्त केली होती. व्याज एकूण दायित्वावर आकारण्यात आले होते. 19 सप्टेंबर रोजी जीएसटी दर आणि इतर मुद्द्यांवर सुधारणा करण्यासाठी परिषदेची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नुकसानभरपाई उपकर आणि नुकसान भरपाई देयक कमी करण्यावर विचार केला जाऊ शकतो.

PF UAN सह आधार लिंक करणे आवश्यक 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) ईपीएफ खात्याला आधार क्रमांकासह पीएफ खाते आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) ला जोडणं अनिवार्य केलं आहे. हे लिंक करण्यासाठी शेवटची तारिख 31 ऑगस्ट होती. म्हणजेच, जर तुम्ही काल (मंगळवार) पर्यंत आपल्या पीएफ खात्यात युनिवर्सल अकाउंट नंबर (यूएएन) नंबरशी लिंक केलं नाही, तर मात्र तुमच्या खात्यात कंपनीच्या वतीनं पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. PF UAN आणि आधार लिंक करण्यासाठी देण्यात आलेली तारिख यापूर्वीच दोन वेळा वाढवण्यात आली आहे. 

पंजाब नॅशनल बँकेच्या व्याजदरात घट 

पंजाब नॅशनल बँकेनं एक सप्टेंबरपासून आपल्या बचत खात्यांवरील व्याजदरात घट केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, वार्षिक 2.90 टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. बँकेच्या सर्व नवीन आणि जुन्या खातेधारकांना हा नियम लागू असणार आहे. 

तेजस रॅकसह धावणार राजेंद्रनगर-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस

सर्वात दर्जेदार आणि प्रीमियम ट्रेन्सपैकी एक 02309/02310 राजेंद्रनगर टर्मिनल-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस विशेष ट्रेन आता अत्याधुनिक सुविधांनी तयार करण्यात आलेल्या तेजस रॅकसह धावणार आहे. त्याशिवाय 1 सप्टेंबर 2021 पासून 02309/02310 राजेंद्रनगर टर्मिनल-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस तेजस रॅकसह धावणार आहे. या बदलामुळं पटणा ते दिल्लीपर्यंतचा प्रवास सुखद होणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget