एक्स्प्लोर

LIC Share Updates : एलआयसीने चिंता वाढवली, शेअर 700 रुपयांखाली घसरला; जाणून घ्या कारण

LIC Share Price : एलआयसी शेअर दराने आतापर्यंतचा नीचांकी दर गाठला असून गुंतवणूकदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

LIC Share Price : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. एलआयसीच्या शेअर दरात सातत्याने सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. एलआयसीच्या शेअर दराने आतापर्यंतचा नीचांकी दर गाठला आहे. एलआयसीच्या शेअर दरात चार टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून 700 रुपयांखाली शेअर दर पोहचला आहे. 

शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीने चिंतेत असलेल्या गुंतवणूकदारांची चिंता एलआयसीने पुन्हा एकदा वाढवली आहे. एलआयसीने आज 680 रुपयांचा नीचांकी दर गाठला. सकाळी 10.55 वाजण्याच्या सुमारास  680.55 रुपयांवर एलआयसीचा शेअर व्यवहार करत होता. आयपीओ किंमतीच्या तुलनेत 27.50 टक्क्यांची घसरण झाली  असून  गुंतवणूकदारांना प्रति शेअर 260 रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. 

एलआयसीच्या शेअर दरात घसरण का?

ॲंकर इन्व्हेस्टर्ससाठी असलेला लॉक-इन कालावधी आज, 13 जून रोजी संपला आहे. एलआयसीच्या शेअरमध्ये होत असलेल्या पडझडीमुळे लॉक-इन कालावधी संपताच ॲंकर इन्व्हेस्टर्सकडे आपले शेअर्स विकण्याचा पर्याय आहे. शेअर्सच्या किमती घसरल्याने हे ॲंकर इन्व्हेस्टर्सही मोठ्या तोट्यात आहेत.ॲंकर इन्व्हेस्टर्सने त्यांच्याकडील शेअर्स विक्री सुरू करू शकतात. याच दबावातून शेअर विक्री सुरू असल्याचे म्हटले जात आहे. 

गुंतवणूकदारांना 1.64 लाख कोटींचे नुकसान

आयपीओमधून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. एलआयसीचे बाजार भांडवल 4.34 लाख कोटींहून अधिक झाले आहे. आयपीओनुसार, एलआयसीचे बाजार भांडवल ( Market Capitalization) हे 6 लाख कोटींहून अधिक होते. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 1.64 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. 

एलआयसीचे साडे तीन टक्के समभाग विक्रीसाठी सरकारनं काढले होते. मात्र, गुंतवणुकदारांना हवा तसा फायदा झाला नाही. दुसरीकडे, निर्गुंतवणुकीतून पैसे उभे करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. मात्र, युक्रेन-रशिया युद्धामुळे असलेली अस्थिरता आणि कोव्हिड परिस्थितीमुळे यात मोठ्या अडचणी येत आहेत. बीपीसीएल आणि आयडीबीआयसारख्या बॅंकांमधून सरकार पैसा उभा करु पाहतेय. मात्र, सरकारी एलआयसीचे उदाहरण बघता पुढील वाट बिकट असल्याचे दिसते.

दरम्यान, आज शेअर बाजार मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 1000 अंकांनी गडगडला. सेन्सेक्स आणि निफ्टी मोठी घसरण झाली आहे. जागतिक शेअर बाजारात सुरू असलेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला असल्याचे दिसून आले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं, उद्धव ठाकरेंनी काय केलं? 
मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं?
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
BMC Election 2026: भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं, उद्धव ठाकरेंनी काय केलं? 
मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं?
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
भाजपकडून नागपुरात 151 जागांसाठी 300 जणांना बाशिंग बांधून तयार राहण्याचे आदेश अन् आता यादी जाहीर न करताच एबी फॉर्म वाटप!
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
निष्ठावंत कार्यकर्त्यांची अशीही कुचंबणा; अर्ज भरला, पण पक्षाने एबी फॉर्मच दिला नाही, महिला उमेदवाराला रडू कोसळले
BMC Election 2026: भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
अरवली पर्वतरांगा प्रकरणात सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती, खाणकामाला सुद्धा स्थगिती; राजस्थानसह चार राज्यांकडून उत्तर मागवलं
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पुण्यात अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; शिवाजीनगरमधून विधानसभा लढलेला नेता राष्ट्रवादीत
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
Embed widget