खिशात पैसे ठेवा तयार! 6,560 कोटींचा दमदार आयपीओ आला, मालामाल होण्याची नामी संधी
गेल्या काही दिवसांत अनेक आयपीओ आले आहेत. या आयपीओंच्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदारांनी चांगला परतावा मिळवलेला आहे. लवकरच एक दिग्गज कंपनी आपला आयपीओ घेऊन येणार आहे.
Bajaj Housing Finance IPO: गेल्या काही दिवसांत अनेक दिग्गज कंपन्यांचे आयपीओ आले आहेत. यातील काही आयपीओंना गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. असे असतानाच आता बजाज हाऊसिंग फायनान्स (Bajaj Housing Finance) या आयपीओची सगळे वाट पाहात होते. हा आयपीओ एकूण 6500 कोटी रुपयांचा असणार आहे. दरम्यान, या आयपीओत पैसे गुंतवण्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या आयपीओमध्ये तुम्हाला 9 सप्टेंबर 2024 ते 11 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे.
ग्रे मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद
कंपनी या आयपीओच्या माध्यमातून ऑफर फॉर सेल तसेच फ्रेश शेअर्सही जारी करणार आहे. ग्रे मार्केटमध्येही या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळतोय. जीएमपीमध्ये या आयपीओचा किंमत पट्टा (प्राईस बँड) 65 रुपयांवर पोहोचला आहे. 3,560 कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू तर 3000 कोटी रुपयांचे ऑफर फॉर सेल असेल.
एकूण 6,560 कोटी रुपयांचा आयपीओ
बजाज हाऊसिंग फायनान्स हा आयपीओ एकूण 6,560 कोटी रुपयांचा आहे. यामध्ये 3,560 कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू तर 3000 कोटी रुपयांचे ऑफर फॉर सेल शेअर्स असतील. बजाज ग्रुपशी (Bajaj Group) संबंध असलेल्या या कंपनीच्या आयपीओची गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहिली जात होती. या कंपनीच्या किंमत पट्ट्याचे मूल्य 3 सप्टेंबर रोजी जाहीर केले जाईल. या आयपीओच्या माध्यमातून प्रमोटर्स आणि शेअरहोल्डर्स त्यांची हिस्सेदारी कमी करतील.
कंपनीकडे 3 लाख ग्राहक, 20 राज्यांत विस्तार
बजाज हाऊसिंग फायनान्स या कंपनीचा एकूण 20 राज्यांत विस्तार झालेला आहे. 2008 साली या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. ही कंपनी आर्थिक वर्ष 2018 सालापासून हाऊसिग लोन देत आहे. ही कंपनी बजाज उद्योग समुहाचाच एक भाग आहे. या कंपनीकडे 31 मार्च, 2024 पर्यंत एकूण 308,693 ग्राहक होते. यातील 81.7 टक्के गृहकर्जाचे ग्राहक आहेत. या कंपनीच्या एकूण 215 ब्रान्च आहेत. ही कंपनी एकूण 20 राज्य व 3 केंद्र शासित प्रदेशात एकूण 174 जागांवर पसरलेली आहे.
हेही वाचा :
मूल्य अवघे 2 रुपये, पण शेअर मार्केटवर बोलबाला, 'हा' पेनी स्टॉक तुम्हालाही देऊ शकतो दमदार रिटर्न्स!
सप्टेंबर महिन्यात तब्बल 15 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी!
मोठी बातमी! सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी दणका, गॅस सिलिंडर महागला, जाणून घ्या नवा दर काय?