मूल्य अवघे 2 रुपये, पण शेअर मार्केटवर बोलबाला, 'हा' पेनी स्टॉक तुम्हालाही देऊ शकतो दमदार रिटर्न्स!
सध्या शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहेत. हीच तेजी हेरून अनेक गुतंवणूकदार चांगला परतावा मिळत आहेत. पेनी स्टॉक्सकडेही गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष आहे.
![मूल्य अवघे 2 रुपये, पण शेअर मार्केटवर बोलबाला, 'हा' पेनी स्टॉक तुम्हालाही देऊ शकतो दमदार रिटर्न्स! penny stocks recommendations know stocks price below rupees two know detail information of filatex fashions stock मूल्य अवघे 2 रुपये, पण शेअर मार्केटवर बोलबाला, 'हा' पेनी स्टॉक तुम्हालाही देऊ शकतो दमदार रिटर्न्स!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/01/32165099b7f993d63fb49452a77d97921725169464225988_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Penny stock return: टेक्सटाइल क्षेत्रात काम करणारी स्मॉलकॅप कंपनी फिवाटेक्स फॅशन ही कंपनी सध्या चांगलीच चर्चेत आहे. या कंपनीत सध्या अनेकजण गुंतवणूक करत आहेत. शुक्रवारच्या सत्रात या कंपनीच्या शेअरचे मूल्य 4.31 टक्क्यांनी वाढून 1.21 रुपयांवर स्थिरावले. 25 जानेवारी 2024 रोजी हा शेअर 4.30 रुपयांपर्यंत पोहोचला होता. 28 ऑगस्ट 2024 रोजी या शेअरचे मूल्य 1.14 रुपये होते. आता सोमवारी गुंतवणूकदारांचे या शेअरवर लक्ष असण्याची शक्यता आहे.
कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर
या कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला सांगितल्यानुसार या कंपनीला 2,97,388 मेट्रिक टन व्हाइट मार्बलचा पुरवठा करण्यासाठी 293 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. फिलाटेक्स फॅशन या कंपनीची उपकंपनी असलेल्या फिलाटेक्स माइन्स अँड मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ही ऑर्डर मिळाली आहे. ही उपकंपनी खनन क्षेत्रात काम करते. ब्लूमफ्लोरा कंपनीने आगामी 54 रुग्णालयांसाठी ही ऑर्डर दिली आहे.
स्टॉक स्प्लिट 2024
या कंपनीने 7 जून, 2024 रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकित 1:5 गुणोत्तरासह स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेतला होता. या मंजुरीअंतर्गत 5 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या 1 इक्विटी शेयरला 5 इक्विटी शेयरों मध्ये विभागलं जाणार.
या कंपनीचे नेमका इतिहास काय?
या कंपनीची सुरुवात 1993 साल झाली. सध्या या कंपनीने युरोपीय आणि भारतीय बाजारात आपला वेगळा दबदबा निर्माण केला आहे. या कंपनीच्या ग्राहकांमध्ये FILA, सर्जियो टॅचिनी, आदीदाद, वॉल्ट डिज्नी तसेच फॅशन जगतातील अनेक दिग्गज ब्रँड्सचा समावेश आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
सप्टेंबर महिन्यात तब्बल 15 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी!
मोठी बातमी! सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी दणका, गॅस सिलिंडर महागला, जाणून घ्या नवा दर काय?
सोन्यानं ग्राहकांना दिला जोर का झटका, ऑगस्टमध्ये दरात मोठी वाढ, सप्टेंबरमध्ये का स्थिती राहणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)