मोठी बातमी! सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी दणका, गॅस सिलिंडर महागला, जाणून घ्या नवा दर काय?
आजपासून गॅस लिंडरच्या दरात बदल झाला आहे. संपूर्ण भारतात आता गॅस सिलिंडरचे नव दर लागू झाले आहेत. मुंबईतही गॅस सिलिंडरचा दर बदलला आहे.
LPG Price 1 September : एलपीजी सिलिंडरचे नवे दर आज जाहीर करण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीपासून तेअहमदाबाद, पाटणा या मोठ्या शहरांपर्यंत एलपीजी गॅस सिलिंडर महागला आहे. 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये (Gas Cylinder New Price) ही वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा दर हा 39 रुपयांनी वाढून तो 1691.50 रुपयांवर पोहोचला आहे. अगोदर हा दर 1652.50 रुपये होता.
गॅस सिलिंडरचे नवे दर काय?
आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून 19 किलो वजनाचा LPG सिलिंड कोलकाता शहरात 1802.50 रुपये झाला आहे. अगोदर हा दर 1764.50 रुपये होता. मुंबई शहरात हा व्यावसायिक गॅस सिलिंडर 1644 रुपये झाला आहे. अगोदर हा गॅस सिलिंडर 1605 रुपये होता. चेन्नई शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडर 1855 रुपये झाला आहे. ऑगस्ट महिन्यात हा दर 1817 रुपये होता. इंडियन ऑईल या कंपनीच्या एलपीजीचा हा दर आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात बदल झाला का?
एक सप्टेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात बदल झाले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचा दर बदलेला नाही. दिल्लीमध्ये 14.2 किलो वजनाचा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर जुन्या दराप्रमाणे 803 रुपयांना मिळत आहे. कोलकाता शहरात हा गॅस 829 रुपये आहे. मुंबईत हा गॅस सिलिंडर दर 802.50 रुपये आहे. चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा दर 818.50 रुपयांना मिळत आहे. ऑगस्ट महिन्यातही या गॅसची किंमत 818.50 रुपयेच होती.
दरम्यान, गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 903 रुपये होती. आता हा गॅस केवळ 803 रुपयांना मिळतोय. । सितंबर 2022 रोजी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल झाला नव्हता.
हेही वाचा :
शिक्षण फक्त 12 वी, महिना 69000 रुपये पगार, सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्यास सुरुवात
Post Office मधील कोणत्या योजनेत किती टक्के परतावा? सर्वाधिक फायदा कोणत्या योजनेत?
RBI चे निर्देश ऐकले का? ओटीपी, केवायसीबाबत दिलेल्या महत्वाच्या सूचना 2 मिनीटं काढून नक्की वाचा