हक्काच्या पक्क्या घरासाठी 'पीएम आवास योजने'साठी करा अर्ज; जाणून घ्या कोणकोणती कागदपत्रे लागतात?
पंतप्रधान आवास योजनेच्या मदतीने तुम्हाला तुमचे हक्काचे घर मिळू शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे, जाणून घ्या...
मुंबई : आजही आपल्या देशात असे अनेक लोक आहेत, ज्यांचे स्वत:चे हक्काचे असे पक्के घर नाही. ही स्थिती फक्त ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातही आहे. आर्थिदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे या लोकांना पक्के घर बांधणे शक्य होत नाही. याच कारणामुळे भारत सरकारने पंतप्रधान आवास योजना आणलेली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही योजना देशभरात राबवली जाते. या योजनेअंतर्गत गरजू लोकांना पक्के घर बांधून देण्यास मदत केली जाते. या योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे गरेजेचे आहे. ही कागदपत्रे कोणती आहेत? हे जाणून घेऊ या....
कोणकोणत्या कागदपत्रांची गरज?
पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे गरजेचे आहे. सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईझचे फोटो असणे गरजेचे आहे.
तुम्हाला हा अर्ज करताना अधिवासाचा पुरावा, वयाचे प्रमाणपत्र, गेल्या सहा महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट, घर, जागेशी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र याची आवश्यकता असते. तुमच्याकडे वर नमूद केलेली कागदपत्रे नसतील तर तुमचा अर्ज रद्द ठरवला जाऊ शकतो.
पंतप्रधान आवास योजनेसाठी असा करा अर्ज?
>>>> पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर pmaymis.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
>>>> त्यानंतर सिटिझन असेसमेंट या ऑप्शनवर क्लिक करा
>>>> त्यानंतर तुमची कॅटेगिरी सिलेक्ट करा
>>>> त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर असलेली माहिती टाकायची आहे.
>>>> त्यानंतर दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज भरा आणि सबमीट करा
>>>> त्यानंतर तुमच्या भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून घ्या.
हेही वाचा :
मुलीच्या लग्नासाठी सरकारकडून मिळते मदत, जाणून घ्या शासनाची 'कन्यादान योजना' आहे तरी काय?
मोठी बातमी! नवीन योजना सुरु होणार, महिलांना 50000 रुपये मिळणार, जाणून घ्या सविस्तर माहिती