एक्स्प्लोर

सोशल मीडियावर राहुल गांधी-प्रणिती शिंदेंच्या लग्नाची चर्चा; नेमकं काय प्रकरण?

Rahul Gandhi And Praniti Shinde : सर्वात महत्त्वाची आणि आश्चर्याची बाब म्हणजे, राहुल गांधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे.

Rahul Gandhi-Praniti Shinde Wedding Rumor : मुंबई : सध्या राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे (Vidhan Sabha Election 2024) वारे वाहत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडीत (Maha Vikas Aagadi) चुरस पाहायला मिळणार आहे. दोन्ही आघाड्यांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार सुरू आहेत. पण सध्या राज्यात निवडणुकांचा विषय बाजूलाच राहिला, वेगळ्याच विषयाच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चा राजकीय वर्तुळासोबतच सगळीकडे पाहायला मिळत आहे. या चर्चा आहेत, राष्ट्रीय स्तरावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या राहुल गांधी यांच्या. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे (Lok Sabha Election) विरोधी पक्षनेते राहुल गांधी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. सर्वात महत्त्वाची आणि आश्चर्याची बाब म्हणजे, राहुल गांधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर संपूर्ण सोशल मीडियावर या चर्चांना ऊत आल्याचं पाहायला मिळतंय. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे म्हणजे, काँग्रेसच्या युवा नेत्या. काँग्रेसचा तरुण चेहरा म्हणून प्रणिती शिंदे यांची ओळख. विशेष बाब म्हणजे, प्रणिती शिंदे सहसाहा आपल्या खासगी आयुष्यावर भाष्य करत नाही. तर, दुसरीकडे राहुल गांधी यांच्या लग्नाच्या चर्चा मात्र, दिवसागणित समोर येत असतात. एकदा तर महाविकास आघाडीच्या भर पत्रकार परिषदेत लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधींच्या लग्नाचा विषय काढला होता. एवढंच काय तर, सध्या अमेरिकेतील विमानतळावरचा राहुल गांधींचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी एका महिलेसोबत दिसत आहे. त्यावरुनही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहेत. 

सध्या प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्या लग्नाच्या अफवा भलत्याच चर्चेत आहेत. अनेकजण तर राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांचे एकत्र चालतानाचे फोटो मॉर्फ करुन शेअर करत आहेत. एकीकडे चर्चांवर चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे दोघांच्या कुटुंबातील कोणीच याबाबत काहीच माहिती देत नाहीय. अर्थात, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

2024 च्या लोकसभेत वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला 

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची कन्या आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची सर्वात तरुण नेतृत्त्व अशी ओळख आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात यावेळी विधानसभेतील दोन प्रतिस्पर्धी आमदार एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते. एक प्रणिती शिंदे आणि दुसरे भाजपचे राम सातपुते. पण प्रणिती शिंदे यांनी 2024 च्या निवडणुकीत जिद्दीनं वडिलांच्या पराभवाचा बदला घेत, दणदणीत विजय मिळवला. 

आमदारकीची हॅट्रिक साधणाऱ्या प्रणिती शिंदे 

सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांचा वारसा प्रणिती शिंदेंकडे गेला. प्रणिती शिंदेंनी सलग तीन वेळा सोलापुरातून आमदारकीची हॅट्रिक घेतली. आमदार प्रणिती शिंदे यांचा सोलापूर शहर मध्यवर्ती हा मतदार संघ 2009 मध्ये तयार झाला. पहिल्याच निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी 34 हजार मतांची आघाडी घेतली होती. 2014 मध्ये मतांची आघाडी घसरून 9 हजारांवर आली. मात्र, 2019 मध्ये पुन्हा 13 हजारांनी त्यांचा लीड वाढला. प्रणिती शिंदे यांची एक ग्लॅमरस राजकारणी म्हणून राज्यात ओळख आहे. प्रणिती शिंदे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वर्किंग कमिटीच्या आमंत्रित सदस्य आहेत. दांडगा जनसंपर्क, मनमिळावू पण, प्रसंगी धाडसी आणि आक्रमक होण्याचा स्वभाव, प्रभावी वत्कृत्व या गुणांमुळे प्रणिती यांनी वडिलांप्रमाणेच अल्पावधीत स्‍वत:ला सिद्ध करून दाखवलंय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan AttackedABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025Saif Ali Khan Attacked Update : सैफला रुग्णालयात नेणाऱ्या ऑटोवाल्याने सांगितला घटनेचा थरारSaif Ali Khan Attcked Update : सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून 35 पथकांची स्थापना, 20 लोकल तर 15 क्राईम ब्रांच पोलिसांची पथकं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Embed widget