(Source: Poll of Polls)
Gpay : खुशखबर! आता 'आधार कार्ड'ने करा UPI पेमेंट, गुगल पे वापरण्यासाठी डेबिट कार्डची गरज नाही
Aadhaar Authentication UPI : गुगल पे युजर्ससाठी आता UPI पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्डची आवश्यकता नाही. तुम्ही आधार कार्डच्या मदतीने UPI पेमेंट करू शकता.
Google Pay Aadhaar Authentication UPI : गुगल पे (Google Pay) युजर्ससाठी चांगली बातमी आहे. आता युपीआय (UPI) पेमेंट करणं आणखी सोपं झालं आहे. गुगल पे युजर्ससाठी आता UPI पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्डची आवश्यकता नाही. तुम्ही आधार कार्डच्या मदतीने UPI पेमेंट करू शकता. त्यामुळे आता यूपीआय ॲक्टिव्ह करण्यासाठी युजर्संना डेबिट कार्डची गरज नाही. युजर्स त्याच्या आधार क्रमांक वापर करून UPI पेमेंट नोंदणी (Registration) करता येते.
UPI पेमेंटसाठी डेबिट कार्डची गरज नाही
गुगल पे युजर्ससाठी आणखी एक सुविधा सुरु करण्यात आली आहे. गुगल पेनं नवीन 'आधार ऑथेंटिकेशन युपीआय' (Aadhaar Authentication UPI) फीचर लाँच केलं आहे. त्यामुळे आता गुगल पे (Google Pay) ने UPI पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्डची गरज नाही. तुम्ही आधार कार्डने व्हेरिफिकेशन करुन पेमेंट करु शकता.
आधार क्रमांक वापरून करा UPI पेमेंट
गुगल इंडिया (Google India) ने UIDAI सोबत आधार क्रमांकावर आधारित UPI पेमेंटसाठी करार केला आहे. कोणत्याही UPAI पेमेंट ॲपसाठी डेबिट कार्ड नंबर आणि पिन आवश्यक आहे, पण आता तुम्ही गुगल पेवर फक्त आधार क्रमांक वापरून पेमेंट करु शकता. गुगल पे ॲपनं ही नवी सुविधा सुरु केली असून सध्या कोणतंही इतर UPI पेमेंट ॲप अशी सुविधा देत नाही.
यासाठी काय करावं लागेल?
गुगल पे (Google Pay) वर आधार क्रमांक वापरुन युपीआय पेमेंट करण्यालाठी तुमचा मोबाइल क्रमांक बँक अकाऊंटसोबत लिंक असणं गरजेच आहे. गुगल पे (Google Pay) ची ही सुविधा सध्या फक्त काही बँकांसाठी उपलब्ध आहे पण लवकरच ही सुविधा सर्व बँकांसाठी सुरु करण्याच येईल.
UPI पेमेंटमध्ये होईल वाढ
गुगल पे च्या आधार लिंक युपीआय पेमेंट सुविधेमुळे देशातील UPI युजर्सच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते. अहवालानुसार, भारतातील 99.9 टक्के लोकांकडे आधार कार्ड आहे. त्यामुळे, आधार कार्डद्वारे UPI सक्रिय केल्याने आधारचा वापर वाढू शकतो. त्यासोबतच डिजिटल पेमेंटही वाढेल.
आधार क्रमांकाने UPI ॲक्टिव्ह करण्यासाठी काय कराल?
- आधार क्रमांकावरून UPI सेवा सक्रिय करण्यासाठी, युजर्सकडे तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेला मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. जर तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही.
- गुगल पे (Google Pay) ॲपमध्ये जाऊन UPI ऑनबोर्ड पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे 6 अंक टाका. यानंतर, युजरला वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपी (OTP) समाविष्ट करावा लागेल, ज्यामुळे तुमच्या बँकेचं प्रमाणीकरण (Authentication) होईल.
- यानंतर तुमचं UPI पेमेंट सक्रिय होईल. यानंतर यूजर्सला UPI पिन टाकावा लागेल.
- एकदा UPI सक्रिय झाल्यानंतर, युजर्स सहजपणे व्यवहार करू शकतील. तुम्हांला पेमेंट आणि शिल्लक रक्कमही तपासता येईल.