एक्स्प्लोर

RBI आणणार आहे UPI पेक्षा सोपी प्रणाली; मोबाईल नेटवर्कशिवाय पैसे पाठवणं शक्य, पण...

RBI लवकरच एक लाईटवेट पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम लॉन्च करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, इंटरनेटशिवाय या प्रणालीद्वारे पैसे पाठवणं शक्य होणार आहे.

RBI Will Introduce Lightweight Payment And Settlement System: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) लाईटवेट पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टमवर काम करत आहे. ही प्रणाली नैसर्गिक आपत्ती किंवा हिंसाचारग्रस्त भागांत कमीतकमी संसाधनांसह कार्य करेल आणि अगदी सहज युजर्सना पैसे ट्रान्सफर करण्यास मदत करेल. ही सुविधा केव्हा सुरू होईल? याबाबत मात्र आरबीआयनं अद्याप काहीही स्पष्ट केलेलं नाही.  

पैसे पाठवण्‍यासाठी सध्या उपलब्‍ध असलेले पर्याय, म्हणजेच UPI, NEFT किंवा RTGS सर्व इंटरनेट आणि इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीच्या मदतीनं काम करतात. आरबीआयचं म्हणणं आहे की, लाईटवेट पेमेंट सिस्टम इंटरनेट आणि इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीच्या तंत्रांवर अवलंबून राहणार नाही, म्हणजेच मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट नसलं तरीही या सुविधेद्वारे तुम्ही पैसे ट्रान्सफर करु शकता.

RBI च्या वार्षिक अहवालात लाईटवेट प्रणालीचा उल्लेख 

RBI नं 30 मे रोजी 2022-23 चा वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये बँकेनं लाईटवेट आणि पोर्टेबल पेमेंट प्रणालीचा उल्लेख केला आहे. आरबीआयनं लिहिलं आहे की, ही प्रणाली कमीतकमी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसह काम करेल आणि ही प्रणाली फक्त गरजेच्या वेळीच वापरली जाईल. म्हणजेच, UPI आणि इतर पेमेंट पद्धतींप्रमाणे, लाईटवेट प्रणाली सर्वांसाठी खुली असणार नाही. ही प्रणाली फक्त अशाच परिस्थितीत वापरली जाईल ज्यावेळी सध्या उपलब्ध असलेल्या UPI, NEFT किंवा RTGS यांसारख्या सुविधा काम करणार नाहीत. 

आरबीआयचं म्हणणं आहे की, ही प्रणाली देशाची पेमेंट आणि सेटलमेंट प्रणाली कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही आणि  इकॉनमी लिक्विडिटी पाईपलाईन टिकवून ठेवेल. ही प्रणाली सुरू झाल्यानं अत्यावश्यक पेमेंट सेवांमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही. अर्थव्यवस्था स्थिर राहण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवहारांमध्ये मदत करणं हाच या प्रणालीचा उद्देश आहे.

आरबीआयनं आपल्या स्टेटमेंटमध्ये लिहिलं आहे की, "युद्धाच्या प्रसंगी बंकर जसे काम करतात, तसंच काहीसं काम ही प्रणाली पेमेंट सिस्टममध्ये करेल. यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही डिजिटल पेमेंट आणि आर्थिक बाजारपेठेतील पायाभूत सुविधांवर लोकांचा विश्वास वाढेल." 

लाईटवेट प्रणाली UPI पेक्षा वेगळी कशी असेल?

सध्या भारतात पेमेंटचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. UPI, NEFT किंवा RTGS यांसारख्या अनेक सुविधा आपण सध्या पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी वापरतो. हे सर्व पर्याय मोठे व्यवहार करण्यासाठी सक्षम असल्याचं आरबीआयचं म्हणणं आहे. दरम्यान, हे कॉम्प्लेक्स नेटवर्क आणि एडवांस्ड इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी इंफ्रास्ट्रक्चरवर आधारित आहेत. आरबीआयचं म्हणणं आहे की, माहिती आणि दळणवळणाच्या पायाभूत सुविधांवर अत्यंत गंभीर परिस्थितीत परिणाम होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत सध्याच्या पेमेंट सिस्टम काम करू शकत नाहीत. म्हणूनच अशा परिस्थितीसाठी आपण तयार असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळेच नव्या प्रणालीचा विचार करण्यात आला असून त्यावर काम सुरू आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

EPFO On WhatsApp : व्हॉट्सअॅपवर EPFO बॅलन्स, पासबुक कसा चेक करायचा?
EPFO On WhatsApp : व्हॉट्सअॅपवर EPFO बॅलन्स, पासबुक कसा चेक करायचा?
दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर 
दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर 
500 रुपयांपासून सुरुवात! आज 5 कोटी रुपयांचा व्यवसाय, संघर्षातून घडलेल्या महिलेची यशोगाथा 
500 रुपयांपासून सुरुवात! आज 5 कोटी रुपयांचा व्यवसाय, संघर्षातून घडलेल्या महिलेची यशोगाथा 
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro Line 3 PM Modi : आधी देवेंद्रजी मुख्यमंत्री, मग मी झालो, देवेंद्रजी पुन्हा आले; आम्ही पुण्यात विकासाची गंगा वाहत ठेवली, अजिदादांचाही सिंहाचा वाटा: एकनाथ शिंदे
आधी देवेंद्रजी मुख्यमंत्री, मग मी झालो, देवेंद्रजी पुन्हा आले; आम्ही पुण्यात विकासाची गंगा वाहत ठेवली, अजिदादांचाही सिंहाचा वाटा: एकनाथ शिंदे
Satara District Bank Election Result 2026: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल, भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या भावाचा पराभव, फलटण सोसायटीतून संजीवराजे नाईक निंबाळकर विजयी
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल, भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या भावाचा पराभव, फलटण सोसायटीतून संजीवराजे नाईक निंबाळकर विजयी
Maharashtra District bank Election Result 2026: जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; सांगली, सातारा, नगरमध्ये कोण-कोण जिंकलं?
जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; सांगली, सातारा, नगरमध्ये कोण-कोण जिंकलं?
Rain Update: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं सावट; 'मुरासू' चक्रीवादळामुळे कोकण, मराठवाडा अन् मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्याची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट
Maharashtra District bank Election Result 2026: सातारा आणि सांगली, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवे कारभारी कोण? वाचा नव्या संचालकांची संपूर्ण यादी
सातारा आणि सांगली, नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवे कारभारी कोण? वाचा नव्या संचालकांची संपूर्ण यादी
Sangli District Central Cooperative Bank election : गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळलाच, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?
Gokul Chairman Election 2026: गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
गोकुळबाबत सतेज पाटलांना ज्याची भीती होती तेच घडलं! महायुतीची चक्रावणारी खेळी, फडणवीसांना विचारुन चौथं नाव ठरणार
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Embed widget