एक्स्प्लोर

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात घसरण सुरुच; सोने 210 रुपयांनी तर चांदी 400 रुपयांनी घसरली

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात किरकोळ घसरण होत असली तरी त्यामध्ये सातत्य आहे. सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नसल्याचं तज्ञांचं मत आहे.

मुंबई : सलग तीन दिवस सोन्याचे दर स्थिर राहिल्यानंतर आता त्यामध्ये पुन्हा एकदा घसरण झाल्याचं पहायला मिळालं आहे. आज सोन्याच्या दरात 210 रुपयांची घट झाली असून मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव हा 47,660 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,660 रुपये इतका आहे. चांदीच्या दरातही 400 रुपयांची घट झाली असून एक किलो चांदीसाठी आता 67,100 रुपये मोजावे लागणार आहेत.

सोन्याच्या दरात सातत्याने घसरण
गेल्या आठवड्याचा विचार करता सोन्याची किंमतींत घसरण आणि स्थिरता दिसून येते. 21 जुलैला 180 रुपये, 22 जुलैला 220 रुपये, 23 जुलैला 30 रुपयांची घसरण झाल्यानंतर पुढचे तीन दिवस सोन्याचे दर स्थिर राहिले. त्यानंतर आज पुन्हा त्यामध्ये 210 रुपयांची घट झाल्याचं दिसून आलंय. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाली आहे, तसेच डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. पण येत्या काळात ही किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. 

गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.

अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा पर्याय आहे. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं होणारी घसरण पाहता ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. 

चांदीच्या दराचा विचार करता गेल्या महिन्यापासून त्यामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याचं दिसून येतंय. गेल्या महिन्यात, 1 जून रोजी चांदीची किंमत ही 72,600 रुपये इतकी होती. त्यानंतर किंमतीत घट होऊन ती 70 हजारांच्या आत आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
मोठी बातमी! माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर ब्रीच कँन्डी रुग्णालयात शस्त्रक्रीया, प्रकृती स्थिर
मोठी बातमी! माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर ब्रीच कँन्डी रुग्णालयात शस्त्रक्रीया, प्रकृती स्थिर
Parbhani violence: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण : सुषमा अंधारेंनी तीन पोलिसांची नावं घेतली, म्हणाल्या, डिपार्टमेंटल चौकशी नकोच!
सुषमा अंधारेंनी सोमनाथ सूर्यवंशीचा फोटो दाखवला; पोलिसांवर गंभीर आरोप, अंगावर वार केल्याच्या खुणा
Gold Rate Today: सोने दरात घसरण, MCX वर देखील दर घसरले, जाणून घ्या आज काय घडलं? 
सोन्याच्या  दरातील तेजीला ब्रेक, दरात घसरण, फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : विरोधकांना जनतेनं मोठा शाॅक दिलाय - चंद्रशेखर बावनकुळेDeepak Kesarkar Nagpur : मला मंत्री करा असं कुणाला सांगितलेलं नाही - दीपक केसरकरShivendraRaje Bhosle Cabinet Minister : जबाबदारी वाढली, चांगलं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेलNitesh Rane Nagpur : हिरवा गुलाल उडवणाऱ्यांना आता हिरव्या मिरच्या लागताय - नितेश राणे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
मोठी बातमी! माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर ब्रीच कँन्डी रुग्णालयात शस्त्रक्रीया, प्रकृती स्थिर
मोठी बातमी! माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर ब्रीच कँन्डी रुग्णालयात शस्त्रक्रीया, प्रकृती स्थिर
Parbhani violence: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण : सुषमा अंधारेंनी तीन पोलिसांची नावं घेतली, म्हणाल्या, डिपार्टमेंटल चौकशी नकोच!
सुषमा अंधारेंनी सोमनाथ सूर्यवंशीचा फोटो दाखवला; पोलिसांवर गंभीर आरोप, अंगावर वार केल्याच्या खुणा
Gold Rate Today: सोने दरात घसरण, MCX वर देखील दर घसरले, जाणून घ्या आज काय घडलं? 
सोन्याच्या  दरातील तेजीला ब्रेक, दरात घसरण, फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे लक्ष
सत्तार, सावंत, केसरकरांच्या नाराजीवर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य; म्हणाले, त्यांनी मंत्रीपदं भोगली, आता...
सत्तार, सावंत, केसरकरांच्या नाराजीवर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य; म्हणाले, त्यांनी मंत्रीपदं भोगली, आता...
धक्कादायक! परभणीत धरपकडीत महिलेला पोलिसांकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
धक्कादायक! परभणीत धरपकडीत महिलेला पोलिसांकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Weekly Horoscope 16 To 22 December 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचं परभणी राड्यावर विधानसभेत भाष्य, म्हणाले, बाबासाहेबांना हे अपेक्षित नाही, विरोधकांनी राजकारण करू नये!
मुख्यमंत्र्यांचं परभणी राड्यावर विधानसभेत भाष्य, म्हणाले, बाबासाहेबांना हे अपेक्षित नाही, विरोधकांनी राजकारण करू नये!
Embed widget