दिलासादायक! नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पण चांदी तेजीत, सध्या सोन्याचा दर काय?
सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर काय आहेत याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
Gold prices : सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर काय आहेत याबाबतची माहिती जाणून घेऊयात. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात सोन्याच्या व्यापारात काहीशी मंदावलेली होती. आज 1 नोव्हेंबर रोजी भारतातील सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. दिवाळीनंतरच्या चढ-उतारानंतर किमतीत झालेली ही पहिलीच मोठी घसरण होती. 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या सर्व श्रेणींमध्ये किमती घसरल्या आहेत. दुसरीकडे, चांदीच्या दरात वाढ झालीय.
24 कॅरेटला काय दर?
सर्वात शुद्ध मानल्या जाणाऱ्या 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत घट झाली. देशभरात 10 ग्रॅम सोन्याची किंमत अंदाजे 280 रुपयांनी घसरून 1 लाख 23 हजार रुपयांवर आली, तर 100 ग्रॅमची किंमत अंदाजे 2800 रुपयांनी घसरून 12 लाख 30 हजार रुपयांवर आली आहे. लहान वजनाच्या पर्यायांमध्येही घसरण दिसून आली आहे. 8 ग्रॅम सोन्याची किंमत 224 रुपयांनी घसरून 98400 रुपयांवर आणि 1 ग्रॅम सोन्याची किंमत 28 रुपयांनी घसरून 12300 रुपयांवर आली आहे.
22 कॅरेट सोने
दागिन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याच्या किमतीतही घट झाली. 10 ग्रॅम सोने आता 112750 रुपयांना विकले जात आहे, म्हणजेच 250 रुपयांची घट झाली आहे. 100 ग्रॅमची किंमत 2500 रुपयांनी कमी होऊन 11 लाख 27 हजार 500 रुपयांवर आली आहे. त्याचप्रमाणे 8 ग्रॅम सोन्याची किंमत 200रुपयांनी कमी होऊन 90200 रुपयांवर आली आहे आणि 1 ग्रॅम सोन्याची किंमत 25 रुपयांनी कमी होऊन 11275 रुपयांवर आली आहे.
18 कॅरेट सोने
हलक्या आणि डिझायनर दागिन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 18 कॅरेट सोन्याची किंमतही घसरली आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 210 रुपयांनी कमी होऊन 92250 रुपयांवर आली आहे, तर 100 ग्रॅम सोन्याची किंमत 922500 रुपयांवर पोहोचली आहे. 8 ग्रॅम आणि 1 ग्रॅम सोन्याच्या किमती अनुक्रमे 73800 आणि 9225 वर होत्या.
चांदीच्या किंमतीत वाढ -
एका बाजुला सोन्याच्या किमतीत घट झाली असली तरी चांदीच्या किमती वाढल्या आहेत. 1 किलो चांदीचा भाव 1000 रुपया ने वाढून 152000 वर पोहोचला. लहान युनिट्समध्येही वाढ झाली. 100 ग्रॅम चांदीचा भाव 15200 10 ग्रॅमचा भाव 1520, 8 ग्रॅमचा भाव 1216 आणि 1 ग्रॅमचा भाव 152 वर पोहोचला.
दरम्यान, दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत आहे. अशातच आज किंचीत दरात घट झाल्यानं खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळं सोन्याची खरेदी करण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली होती.
महत्वाच्या बातम्या:
सोन्याची पुन्हा एक गटांगळी! 24 तासांत सोन्याचा भाव 4 हजारांनी घसरला, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?


















