सोने, चांदीचा भाव वधारला, चांदी लवकरच एक लाखाच्या पुढे? जाणून घ्या नेमका दर काय?
जागतिक पातळीवर सोन्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे सध्या भारतात सोन्याचा दर वाढला आहे. हीच वाढ आगामी काळातही होण्याची शक्यता आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढऊतार पाहायला मिळत आहे. मात्र एकंदरीतच या चढउताराच्या काळात या दोन्ही धातूंची किंमत वधारल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या जागतिक पातळीवर सोने, चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज जळगावमधील सुवर्ण नगरीत जीएसटीसह सोन्याचे दर तब्बल 76500 (दहा ग्रॅम) तर चांदी 96000 हजार रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचली आहे.
जगातिक पातळीवर सोन्याची मागणी वाढली
सोने व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक पातळीवर सोन्याची मागणी वाढली आहे. सोने आणि चांदीची खरेदी ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुळेच भारताचे शेजारील चीन या देशाने सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच परिमाम म्हणून सध्या भारतात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 76500 तर चांदीचा प्रतिकिलो 96000 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. भविष्यातही जागतिक पातळीवरील सोन्याची मागणी कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे आगामी काळातही सोने आणि चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांतील देशातील वेगवेगळ्या शहरांतील सोन्याचा दर (Gold And Silver Rate Today)
चेन्नई - 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,850 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7473 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नवी दिल्ली - 22 कॅरेट सोन्याची किंमत 6855 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7577 रुपये प्रति ग्रॅम आहे.
कोलकाता - 22 कॅरेट सोन्याची किंमत 6840 रुपये प्रति ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7462 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मुंबई - 22 कॅरेट सोन्याची किंमत 6840 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7462 रुपये प्रति ग्रॅम आहे.
अहमदाबाद - 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,765 रुपये प्रति ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,380 रुपये प्रति ग्रॅम आहे.
भोपाळ - 22 कॅरेट सोन्याची किंमत 6845 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7467 प्रति ग्रॅम आहे.
हैदराबाद - 22 कॅरेट सोन्याची किंमत 6840 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7462 प्रति ग्रॅम आहे.
हेही वाचा :
शेअरची किंमत 5 रुपयांपेक्षा कमी, पण 120 टक्क्यांनी दिले रिटर्न्स, गुंतवणूकदारांना लॉटरी!
एका आठवड्यात 'हे' पाच पेनी स्टॉक ठरले रॉकेट, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
करोडपती व्हायचंय? मग फक्त 'हा' एक फॉर्म्यूला पाळा, नक्की पडेल पैशाचा पाऊस!