एक्स्प्लोर

Gautam Adani: अदानींच्या मुलाच्या लग्नात ना सेलिब्रेटींचा महाकुंभमेळा.. ना कसला भपकेबाज खर्च, उलट 'या' कृतीने अनेकांच्या भुवया उंचावल्या

गुजराती पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या जीत अदाणी आणि दिवा शहा यांच्या विवाहसोहळ्यात कोणतेही सेलिब्रिटी, राजकीय नेते किंवा बडे उद्योगपती आमंत्रित नव्हते.

अहमदाबाद: आपल्या मुलाचा विवाह परंपरागत पद्धतीने आणि अत्यंत साधेपणे केला जाईल असे अदाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी (Gautam Adani) यांनी महाकुंभमेळ्यातील आपल्या भेटीदरम्यान जाहीर केले होते. आपल्या मुलाचा विवाह साधेपणे होईल असे त्यांनी आधीच जाहीर केले होते. त्यामुळे हा विवाह अत्यंत भपकेबाज आणि खर्चिक पद्धतीने होईल या अफवांनाही पूर्णविराम दिला होता. दरम्यान, अदाणी यांनी या विवाहानिमित्त 10 हजार कोटी रुपये समाजाकरिता देण्याचे जाहीर केले. जीत गौतम अदाणी याच्या विवाहानिमित्त गौतम अदाणी यांनी समाजसेवेसाठी जाहीर केलेली ही रक्कम वेगवेगळ्या समाजोपयोगी कामांसाठी वापरली जाईल असं सांगण्यात आलंय. आजकाल उद्योग जगतात बिग फॅट वेडिंगचं प्रस्थ वाढत असताना गौतम अदानींच्या या निणर्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  गौतम अदाणी हे जगातील प्रमुख श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात.

गुजराती पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या जीत अदाणी आणि दिवा शहा यांच्या विवाहसोहळ्यात कोणतेही सेलिब्रिटी, राजकीय नेते किंवा बडे उद्योगपती आमंत्रित नव्हते. अत्यंत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विवाहाने कॉर्पोरेट जगतात संपत्तीचे प्रदर्शन करण्याऐवजी सामाजिक बांधिलकीचे नवे उदाहरण घालून दिले. अदाणी समूह सध्या विमानतळ, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि डेटा सेंटर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. विशेषतः ग्रीन एनर्जी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात अदाणींची गुंतवणूक लक्षणीय आहे. 

कुठे खर्च केली जाणार देणगी?

'सेवा साधना है, सेवा प्रार्थना है और सेवा ही परमात्मा है', या गौतम अदाणींच्या तत्वानुसार या निधीतून कशा प्रकारे समाजसेवा करावी हे ठरवण्यात आले आहे. आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील पायाभूत उपक्रमांसाठी या देणगीतील सर्वात जास्त रक्कम खर्च होईल. या उपक्रमातून, समाजातील सर्व घटकांना परवडण्याजोग्या दरातील जागतिक दर्जाची रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालय, तसेच परवडणाऱ्या दरातील पण उच्च दर्जाच्या के ट्वेल्व्ह शाळा आणि कौशल्य विकास शिक्षण तसेच नोकरीची हमी देणाऱ्या जागतिक दर्जाच्या कौशल्य अकादमी स्थापन केल्या जातील. 

जीत अदाणी हा सध्या अदाणी एअरपोर्ट्सचा संचालक आहे. या कंपनीतर्फे सहा आंतरराष्ट्रीय विमानतळांचे व्यवस्थापन केले जाते आणि नवी मुंबई येथील सातव्या विमानतळाच्या उभारणीचे कामही कंपनीतर्फे केले जात आहे.जीत याने युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिलव्हेनियाज स्कूल ऑफ इंजीनियरिंग अॅप्लाईड सायन्स मधून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. या विवाहाच्या दोन दिवस आधी गौतम अदाणी यांनी यानिमित्त मंगल सेवा हा समाजसेवी उपक्रम जाहीर केला होता. याद्वारे 500 विवाहित दिव्यांग वधूंना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे सहाय्य पुरवले जाणार आहे. दरवर्षी एवढेच सहाय्य दिले जाणार असून विवाहाच्या निमित्ताने जीत याने या उपक्रमाची सुरुवात करताना 21 नवविवाहित अपंग महिला आणि त्यांच्या पतींची भेट घेऊन त्यांना सहाय्य दिले. 

अदानींचं Tweet चर्चेत

मुलाच्या विवाह प्रसंगी गौतम अदाणी यांनी खालील प्रमाणे ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. परमपिता परमेश्वराच्या आशीर्वादाने जीत आणि दिवा हे दोघे आज विवाहबद्ध झाले आहेत. हा विवाह आज नातलग आणि परिचित यांच्या उपस्थितीत पारंपारिक रीतीरिवाज आणि ज्येष्ठांच्या शुभ आशीर्वादात झाला. हा एक अत्यंत छोटा आणि वैयक्तिक घरगुती समारंभ होता. त्यामुळे इच्छा असूनही सर्व हितचिंतकांना या विवाहासाठी बोलवणे आम्हाला शक्य झाले नाही, त्यामुळे आम्हाला क्षमा करावी. पुत्री दिवा आणि जीत यांच्या विवाहानिमित्त आपण त्यांना शुभ आशीर्वाद द्यावेत हीच माझी इच्छा आहे.

या ट्वीटमध्ये गौतम अदाणी यांनी आपली सूनबाई दिवा हिचा उल्लेख मुलगी असा केला, हे उल्लेखनीय आहे असे दाखवून दिले जाते. अहमदाबाद मधील अदाणी शांतीग्राम वसाहती मधील बेलवेदर क्लब मध्ये आज दुपारी जीत आणि दिवा यांचा विवाह झाला. विख्यात हिरे व्यापारी जैमिन शहा याची दिवा ही कन्या आहे. हा विवाह अत्यंत साधेपणे आणि नेहमीच्या परंपरागत धार्मिक रीतीरिवाजांनुसार आणि नंतर परंपरागत गुजराती पद्धतीनुसार झाला. त्याला फक्त जवळचे नातलग आणि मित्र अशा मोजक्या मंडळींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या विवाहास बडे राजकारणी, परदेशी मुत्सद्दी, उद्योजक, सनदी अधिकारी, चित्रपट तारे तारका, करमणूक करणारे व्यावसायिक आणि अन्य सेलिब्रिटींची अनुपस्थिती ठळकपणे जाणवत होती. 

विवाहालाही सेलिब्रिटींचा महाकुंभमेळा जमेल का ?..

जीत आणि दिवा यांनी विवाहानिमित्त समाजसेवी उपक्रमांनी आपल्या सहजीवनाची सुरुवात केली, याबद्दल गौतम अदाणी यांनी देखील ट्विटद्वारे समाधान व्यक्त केले होते. गौतम अदाणी प्रयागराज येथे महा कुंभमेळ्यात २१ जानेवारी रोजी सहभागी झाले होते. तेव्हा, त्यांचा मुलगा जीत याच्या विवाहानिमित्त देखील सेलिब्रिटींचा महा कुंभमेळा जमेल का ? असे त्यांना विचारल्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला होता. आम्ही सर्वसामान्य माणसांप्रमाणेच आहोत. जीत येथे फक्त गंगामातेचे आशीर्वाद घेण्यासाठी आला आहे. त्याचा विवाह परंपरागत पद्धतीने साधेपणानेच होईल, असेही ते ठामपणे म्हणाले होते. त्यानुसार हा विवाह साधेपणाने झाला. स्वतःपेक्षा सेवा मोठी या गौतम अदाणी यांच्या तत्त्वानुसार केलेली कृती म्हणजे, बड्या व्हीआयपी मंडळींचे विवाह कसे असावेत, याचे एक उदाहरणच असल्याचे बोलले जाते. समाजसेवेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊन आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षणही कसे साजरे करावेत, याची व्याख्या अदाणी यांनी विचारपूर्वक बदलली असल्याचे दाखवून दिले जात आहे. संपत्तीचे प्रदर्शन करण्याऐवजी त्यांनी विचारपूर्वक समाजसेवेवर भर देऊन वेगळाच आदर्श निर्माण केल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा:

'ही' चूक टाळा अन्यथा होणार मोठा तोटा, LIC चा करोडो पॉलिसीधारकांना इशारा, ग्राहकांनी नेमकं काय करावं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Result 2026: पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
BMC Election Result 2026: उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
Chhatrapati Sambhajinagar MIM Winner List: गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
Malegaon Election Result 2026 : मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी
मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Result 2026: पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
पुणेकरांनो! हे आहेत तुमच्या महापालिकेत 165 नवनिर्वाचित नगरसेवक, कोणत्या पक्षाने किती जागांवर मिळवला विजय, वाचा एका क्लिकवर
BMC Election Result 2026: उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
उमेदवारी अर्जासाठीही उधार पैसे घेत निवडणूक लढला, ओवैसींचा विश्वास सार्थकी लावत दणदणीत विजय; मुंबईतील MIMचा हिंदू नगरसेवक कोण?
Chhatrapati Sambhajinagar MIM Winner List: गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
गुलमंडीसारख्या शिवसेनेच्या गडातही उमेदवारांची बाजी; काकासाहेब काकडे ते सुनीता वाहुळ, संभाजीनगरमधील MIM चे नगरसेवक कोण कोण?
Malegaon Election Result 2026 : मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी
मालेगावकरांनो 'हे' आहेत तुमच्या महापालिकेतील 84 नवनिर्वाचित नगरसेवक, इस्लाम पार्टीचे 35, एमआयएमचे किती? पाहा यादी
प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला आज राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार; चेहरा सुद्धा ठरला; सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
मुंबई महापौरपदावरून भाजप शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेचमध्ये ठाकरेंची एन्ट्री? उद्धव ठाकरेंनी मोजक्याच शब्दात विषय संपवला!
BMC Elections 2026: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांच्या अंधेरी मतदारसंघातही ठाकरेंचाच बोलबाला; 8 पैकी 5 जागा जिंकत दिली धोबीपछाड!
Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
एकनाथ शिंदे प्रचंड नाराज, भाकरी फिरवण्याच्याही तयारीत; मुंबईतही धावाधव, नेमकं काय घडतंय?
Embed widget