एक्स्प्लोर

'ही' चूक टाळा अन्यथा होणार मोठा तोटा, LIC चा करोडो पॉलिसीधारकांना इशारा, ग्राहकांनी नेमकं काय करावं?

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने आपल्या ग्राहकांना आणि पॉलिसीधारकांना सावधगिरी बाळगण्यासंदर्भात सूचना केली आहे.   अनेक ठिकाणी बनावट मोबाईल अॅप्लिकेशन्स प्रसारित केले जात आहेत.

LIC Policyholders Alert: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने आपल्या ग्राहकांना आणि पॉलिसीधारकांना सावधगिरी बाळगण्यासंदर्भात सूचना केली आहे.   अनेक ठिकाणी बनावट मोबाईल अॅप्लिकेशन्स प्रसारित केले जात आहेत. LIC ने एक नोटीस जारी करून ग्राहकांना फक्त अधिकृत वेबसाइट www.licindia.in किंवा LIC डिजिटल ॲप द्वारे व्यवहार करण्याची विनंती केली आहे. तसेच, केवळ मान्यताप्राप्त, वैध अॅप ज्याचे तपशील LIC च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेले आहेत तेच वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

पॉलिसीधारकांसाठी एलआयसीचा इशारा

LIC ने एक नोटीस जारी केली आहे ज्यामध्ये ग्राहकांना फक्त अधिकृत वेबसाइट www.licindia.in किंवा LIC डिजिटल ॲप द्वारे व्यवहार करण्याची विनंती केली आहे. तसेच, केवळ मान्यताप्राप्त, वैध अॅप वापरण्याची विनंती केली आहे. एलआयसी इंडियाने सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, एलआयसीच्या नावाने बनावट मोबाइल ॲप्लिकेशन्स प्रसारित केले जात आहेत. आम्ही सर्व पॉलिसीधारक आणि ग्राहकांना LIC ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट (www.licindia.in) किंवा LIC डिजिटल ॲप आणि आमच्या वेबसाइट www.licindia.in वर व्यवहार करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही पर्यायी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे केलेल्या कोणत्याही पेमेंटसाठी LIC ऑफ इंडिया जबाबदार राहणार नसल्याचे म्हटलं आहे

ग्राहकांनी काय करावं?

फक्त LIC चे अधिकृत मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करा.

सर्व पेमेंट आणि व्यवहारांसाठी फक्त www.licindia.in किंवा LIC डिजिटल ॲप वापरा.

कोणतेही संशयास्पद ॲप किंवा वेबसाइट दिसल्यास, ताबडतोब LIC ग्राहक सेवेशी संपर्क साधा.

डिजिटल व्यवहार करताना सायबर सुरक्षेची काळजी घ्या आणि फसवणूक टाळा.
एलआयसी पॉलिसीधारकांना मदत कोठे मिळेल?

LIC (लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत किंवा फसवणूक झाल्यास, आपण या विविध मार्गांनी विमा कंपनीकडून मदत घेऊ शकता. तुम्हाला काही समस्या असल्यास किंवा LIC पॉलिसीशी संबंधित माहिती हवी असल्यास, तुम्ही यापैकी कोणतीही पद्धत अवलंबू शकता.

1. एलआयसीची अधिकृत वेबसाइट

तुम्ही www.licindia.in वर भेट देऊन पॉलिसी स्टेटस, प्रीमियम पेमेंट, ग्राहक सेवा, दावे आणि इतर माहिती मिळवू शकता.

2. LIC ग्राहक सेवा क्रमांक

टोल-फ्री क्रमांक: 1800-267-9090 (सोमवार ते शुक्रवार, सकाळी 8:00 ते रात्री 8:00)

3. जवळच्या LIC शाखेला भेट द्या

तुमच्या शहराच्या किंवा परिसरातील जवळच्या LIC शाखेला भेट देऊन तुम्ही थेट अधिकाऱ्यांकडून मदत मिळवू शकता.

4. LIC ईमेल सपोर्ट

तुम्ही तुमची समस्या किंवा तक्रार grievance@licindia.com वर पाठवू शकता.

5. LIC हेल्प डेस्क (SMS सेवा)

LIC ची SMS सेवा वापरून ग्राहक ASKLIC <पॉलिसी नंबर> 9222492224 किंवा 56767877 वर पाठवू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Investment : महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगानुसार लेवल 10 च्या कर्मचाऱ्यांची लॉटरी, 10 वर्षांत मिळणार 34 लाख रुपये एक्स्ट्रा; पाहा कॅल्क्युलेशन
आठव्या वेतन आयोगानुसार लेवल 10 च्या कर्मचाऱ्यांची लॉटरी, 10 वर्षांत मिळणार 34 लाख रुपये एक्स्ट्रा; पाहा कॅल्क्युलेशन
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?

व्हिडीओ

Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
Embed widget