(Source: ECI/ABP News/ABP Majha)
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
EPFO Name Change : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांची पगारातून काही रक्कम कपात करुन भविष्य निर्वाह निधी योजनेत साठवले जातात.
नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओची स्थापना केली आहे. एखाद्या खासगी कंपनीत कर्मचारी रुजू झाला की त्याच्या नावानं ईपीएफओमध्ये भविष्य निर्वाह निधी म्हणून ठराविक रक्कम जमा केली जाते. संबंधित कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या 12 टक्के रक्कम ईपीएफ म्हणून जमा केली जाते. ही रक्कम कर्मचाऱ्याचं योगदान म्हणून ओळखली जाते. तर, दुसरीकडे संबंधित कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या पीएफच्या खात्यात 3.67 टक्के रक्कम जमा केली जाते. इतर रक्कम ही पेन्शन म्हणून जमा करण्यात येते. तर, उर्वरित 8.33 टक्के रक्कम ईपीएस खात्यात जमा केली जाते अनेकदा ईपीएफओ नोंदणीची कामं त्रयस्थ कंपनीला दिलेली असतात अशा वेळी काही चुका होण्याची शक्यता असते. ईपीएफओनं नाव, जन्मतारीख बदलण्यासंदर्भात एक व्हिडीओ जारी केला आहे. त्या व्हिडीओ नुसार काही बदल करायचे असल्यास कर्मचारी आणि संबंधित कंपनी यांच्याकडून संयुक्त प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं.
जाणून घेऊया नाव बदलण्याची प्रक्रिया
पीएफ रेकॉर्डमध्ये नाव, जन्मतारीख, लिंग, वैवाहिक स्थिती, आई वडिलांचं नाव दुरुस्त करण्याची प्रक्रिया सोपी आहे. नाव, लिंग आणि जन्मतारीख बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नाव, जन्मतारीख, लिंग अपडेट करण्याची संधी केवळ एक असेल.वैवाहिक स्थिती अपडेट करण्यासाठी दोन वेळा संधी असते. नाव बदलायचं असल्यास कोणती कागदपत्रं लागतात ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे.आधार कार्ड, पासपोर्ट, मृत्यू दाखला, जन्म दाखला. सरकारी आस्थापनेनं दिलेलं ओळखपत्र, बँक पासबूक फोटो असणारं, पॅन कार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळखत्र, निवृत्तीवेतनधारक कार्ड,राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना, जात प्रमाणपत्र, नावातील पहिल्या बदलासाठी गॅझेट नोटिफिकेशन आवश्यक असून त्यावर जुनं नाव आणि नवं नाव असणं आवश्यक आहे.
नावातील बदलाची मेजर बदल आणि मायनर बदल अशी विभागणी केली जाते. मायनर बदलासाठी वर दिलेल्या कागदपत्रांपैकी दोन कागदपज्ञत्रं तर मेजर बदलासाठी तीन कागदपत्रं जमा करावी लागतात. नावात दोन पेक्षा अधिक अक्षर बदलल्यास, नावाचा विस्तार केला जाईल त्याला मेजर बदल म्हणतात. जन्मतारखेत बदल तीन वर्षांपेक्षा अधिक असल्यास तो मेजर बदल मानला जाईल. तर, तीन वर्षांपर्यंत बदल केल्यास तो मायनर म्हणून ओळखला जातो. जन्मतारखेत बदल करताना मेजर बदलासाठी तीन कागदपत्रं तर मायनर बदलासाठी दोन कागदपत्र द्यावी लागतील. ईपीएएफओ खातेदाराला रेकॉर्डमधील लिंग बदल करायचा असल्यास तो मायनर बदल अस मानलजं तातं.
इतर बातम्या :
दिवाळीपूर्वीच झटका! ऐन सणासुदीच्या काळात व्यावसायिक गॅस सिलिंडर महागले; नवे दर लागू!