एक्स्प्लोर

Leave And License : घर बसल्या करता येणार घरभाडे करार! ना फेऱ्यांची कटकट ना वेळेची झंझट

E-Rent Agreement: घर भाड्याने देण्यासाठी भाडे करार मिळण्याची प्रक्रिया आता घरी बसून सहज पूर्ण करता येणार आहे. 

Leave And License : तुम्ही नोकरीच्या निमित्ताने, मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने अथवा कोणत्याही कारणाने वेगळ्या शहरात स्थलांतर केलंय. घर भाड्याने घेतलं आहे आणि हा भाडेकरार कुठे करायचा, सरकारी कचेरीच्या पायऱ्या कशा चढायच्या? कोणाची ओळख असेल का हे सगळे प्रश्न तुमचे लवकरच सुटणार आहेत. कारण घर भाड्याने देण्यासाठी भाडे करार मिळण्याची प्रक्रिया आता घरी बसून सहज पूर्ण करता येणार आहे. 

यामुळे भाडे करारासाठी लागणारा वेळ वाचण्याबरोबरच धावपळ आणि मेहनत कमी लागेल. एका राज्यामध्ये ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. ज्याचा फायदा फक्त घरमालकांनाच नाही तर भाडेकरूंनाही होणार आहे. भाडेकरार मिळवण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या बदलांबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊया.
 
ई-भाडेकराराचा फायदा

ई-भाडे करार केल्यास लोकांचा वेळ वाचणार आहे. भाडेकरार अवघ्या 5 ते 10 मिनिटांत घरी बसून बनवता येतो आणि त्यानंतर त्याची प्रिंट काढता येते. ई-भाडे करारामुळे घरमालकाला त्याच्या मालमत्तेची सुरक्षितता आणि मालकीबाबत कायदेशीर बळ मिळेल. त्यामुळे भाडेकरूने घरमालकाचे घर ताब्यात घेण्याची शक्यता नाहीशी होईल.

बरेचदा असे दिसून येते की, घरामध्ये दीर्घकाळ भाडेकरू म्हणून राहिल्यानंतर लोक त्यावर आपला हक्क सांगतात, परंतु या करारानंतर घरमालकाकडे पुरावे असतील आणि त्याची बाजू भक्कम होईल. त्यामुळे त्याला कायदेशीर लढाईत फायदा होणार आहे.
 
महाराष्ट्रातही ऑनलाईन करार?

महाराष्ट्रातही ऑनलाईनपद्धतीने तुम्हाला भाडेकरार करता येतो याची माहिती आहे का? तर त्याबद्दल जाणून घेऊया आधी. तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने करायचे असेल तर त्यासाठी Leave & License चा परवाना असेल तर तुम्ही घरबसल्या तुमची रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी भरु शकता. हा परवाना जिल्हा अधिकाऱ्यांकडून दिला जातो. हा परवाना असेल तर अशा संबंधित मंडळींकडून जाऊन तुम्ही भाेडकरार अथवा तुमचे इतर दस्तऐवज जे काही करायचे असतील ते करु शकता.
 
महाराष्ट्रात भाडेकरार फी किती?
 
तुम्हाला एखादे घर भाड्याने घ्यायचे असेल तर त्यासाठी घरमालक आणि भाडेकरु यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, जी मालमत्ता भाड्याने घ्यायची आहे त्याचे लाईट बिल अशी महत्त्वाचे म्हणजे भाडेकरार दस्तऐवज अशी काही कागदपत्रे लागतात.
 
आजमितीला कायदेशीर शुल्क- 700 रुपये इतके आकरले जाते. त्याचप्रमाणे स्टँम ड्यूटी ही मालमत्तेची किंमत आणि डिपॉझिट देण्यात येणारी किंमत याच्यावर 0.25 टक्के इतकी आकारली जाते. तर  महानगरपालिका क्षेत्रात घर असेल तर 1000 रजिस्ट्रेशन शुल्क आकारालं जातं आणि नगरपरिषद, नगरपालिका क्षेत्रात 500 रुपये शुल्क घेतलं जातं.
 
ई-भाडेकरार सुविधा कुठे सुरु?
 
उत्तर प्रदेशात ही सुविधा सुरू होणार आहे. घरबसल्या भाडे करार करण्याची सुविधा प्रथम गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात सुरू होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील विशेषत: नोएडामधील घरमालक आणि भाडेकरूंना दिलासा मिळणार आहे. भाडे करार करून घेण्यासाठी त्यांना फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. जिल्ह्यात ई-भाडे कराराची सुविधा सुरू करण्यासाठी शासनस्तरावरून परवानगी मिळाली आहे.

स्टॅम्प होल्डिंग कॉर्पोरेशनकडून एनओसी मिळाल्यानंतर संबंधित पोर्टलवर ई-भाडे कराराची सुविधा सुरू केली जाईल. लोक आधीच व्यावसायिक मालमत्तेसाठी लीज डीड करार करत आहेत परंतु आतापर्यंत ते डीड लेखक (वकील) तयार करत आहेत. त्यानंतर त्याची फी ऑनलाइन माध्यमातून जमा करण्यात आली.
 
त्यामुळे आता उत्तरप्रदेशात सुरु होणारा हा प्रयोग आगामी काळात संपर्ण देशातही राबवला जातो का आणि त्याला आता प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतोय आणि सरकारसोबतच सर्वसामान्य जनता याला कसा प्रतिसाद देईल हे आगामी काळात स्पष्ट होईल. केवळ ही प्रक्रिया गुंतागुंतीची नसावी इतकीच अपेक्षा नागरिक करत आहेत. 

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget