एक्स्प्लोर

Pankaja Munde : वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण

Pankaja Munde : वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे फरार असताना दिंडोरीतील स्वामी समर्थ केंद्र येथे आल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता.

Pankaja Munde : संतोष देशमुख प्रकरणातील (Santosh Deshmukh Case) आरोपी वाल्मिक कराड (Walmik karad) आणि विष्णू चाटे (Vishnu Chate) फरार असताना दिंडोरीतील स्वामी समर्थ केंद्र (Swami Samarth Kendra) येथे आल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झाले असून या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. त्यातच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) या आज रविवारी (दि. 09) नाशिकमध्ये दाखल झाल्या असून स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

खंडणी प्रकरणात जेव्हा वाल्मिक कराड याचा पोलीस शोधत होते, तेव्हा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे आण्णासाहेब मोरे म्हणजे गुरू माऊली यांच्या  आश्रमात 15 आणि 16 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि 17 तारखेला ते आश्रमाच्या बाहेर निघून गेले, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता. दिंडोरीच्या आश्रमात जर त्यांना आश्रय दिलं गेला असेल तर तेथील जे प्रमुख आहे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांना देखील सहआरोपी केलं पाहिजे, असेही त्यांनी म्हटले होते. यानंतर दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्राच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. आयडीचे अधिकारी आमच्या केंद्रात तपासासाठी आले होते. त्यांनी आमचे सीसीटीव्ही तपासले.  त्यात वाल्मिक कराड 16 तारखेला दर्शनासाठी आले आणि निघून गेलेत. दत्तजयंतीचा सप्ताह आमच्याकडे होता तेव्हा ते आले होते. त्यावेळी असंख्य भाविक आमच्याकडे आले होते. त्यामध्ये कोण आले हे  आम्हाला माहिती नव्हते, असे स्वामी समर्थ केंद्राचे प्रतिनिधी आबासाहेब मोरे यांनी म्हटले होते.  

स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंची उपस्थिती

आता नाशिकमध्ये स्वामी समर्थ केंद्र प्रणित जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांची हजेरी लावली आहे. मात्र या कार्यक्रमाला स्वतः अण्णासाहेब मोरे अनुपस्थित असल्याचे दिसून आले. अण्णासाहेब मोरे यांचा मुलगा आबासाहेब मोरे कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहे. पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.  

स्वामी समर्थ केंद्र यापुढे कोणत्याही विषयात पडणार नाही

दरम्यान, आज स्वामी समर्थ केंद्राचे प्रतिनिधी आबासाहेब मोरे कार्यक्रमातील भाषणात बोलताना म्हणाले की, स्वामी समर्थ केंद्र या पुढे कोणत्याही विषयात पडणार नाही. कारण चांगले काम करताना खूप कष्ट घ्यावे लागतात पण चुकीचे कोणीतरी काही तरी बोलत आणि त्यावर बातमी होते, असे म्हणत तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांचा आबासाहेब मोरे यांच्याकडून समाचार घेण्यात आला.  

आणखी वाचा 

Walmik Karad : वाल्मिक कराड अन् दिंडोरीच्या आश्रमाचं कनेक्शन; तृप्ती देसाईंच्या खळबळजनक दाव्यानंतर स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
PHOTO : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
Sunita Williams : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
Video : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bank Strike | 24 आणि 25 मार्चला बँकांचा संपाचा इशारा, सलग ४ दिवस बँका बंद राहिल्यास नागरिकांना अडचणABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 19 March 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNagpur Crime Update | त्या रात्री जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग, वर्दी खेचण्याचा केला प्रयत्नABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 19 March 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
PHOTO : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
Sunita Williams : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
Video : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
Embed widget