Dhruv Rathee on Arvind Kejriwal : दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या साम्राज्याला भाजपचा सुरुंग, पण ध्रुव राठीच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाला तरी काय?
केजरीवाल आणि ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांना आपली जागा वाचवता न आल्याने सर्वात मोठा धक्का बसला आहे. दिल्लीत गेल्या दशकभरापासून सत्तेत असलेला आम आदमी पक्ष या निवडणुकीत पूर्णपणे विखुरलेला दिसला.

Delhi Assembly Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप तब्बल 27 वर्षानंतर सत्तेत परतला आहे. या ऐतिहासिक विजयाने आम आदमी पक्षाचा (आप) दारुण पराभव झाला. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांना आपली जागा वाचवता न आल्याने सर्वात मोठा धक्का बसला आहे. दिल्लीत गेल्या दशकभरापासून सत्तेत असलेला आम आदमी पक्ष या निवडणुकीत पूर्णपणे विखुरलेला दिसला.
AAP lost because no work was being done in Delhi since last few years
— Dhruv Rathee (@dhruv_rathee) February 8, 2025
And that is because BJP did everything possible to stall the whole functioning of the government. From using LG to halt orders, to their agencies jailing leaders under fake cases to passing new laws. Ever…
नेत्यांना अडकवण्यासाठी एजन्सीचा वापर केला आणि अनेक धोरणे रखडली
निवडणुकीच्या निकालानंतर, यूट्यूबर ध्रुव राठीने आम आदमी पार्टीच्या पराभवासंदर्भात एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्यांनी पराभवाची मुख्य कारणे दिली आणि भाजपवर निशाणा साधला. राठी म्हणाला की, गेल्या काही वर्षांत दिल्लीत कोणतेही मोठे विकास काम झाले नाही कारण भाजपने आप सरकारला सुरळीतपणे काम करण्यापासून रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. त्यांनी आरोप केला की भाजपने नायब राज्यपालांच्या मदतीने आप सरकारचे आदेश रोखले, कायदेशीर बाबींमध्ये नेत्यांना अडकवण्यासाठी एजन्सीचा वापर केला आणि अनेक धोरणे रखडली.
भाजपच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले
ध्रुव राठी पुढे म्हणाला की 2023 मध्ये जीएनसीटीडी कायदा मंजूर झाल्यानंतर दिल्लीवर अप्रत्यक्षपणे भाजपचे राज्य होते. त्यांच्या समस्यांना खरेच जबाबदार कोण हे आता जनतेला स्पष्ट दिसेल. आगामी काळात दिल्लीत वायू प्रदूषण, यमुना प्रदूषण, पायाभूत सुविधांच्या समस्या आणि स्वच्छता या मुद्द्यांवर चर्चा होणार का? इतर राज्यांप्रमाणे धार्मिक ध्रुवीकरण करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यात भाजप यशस्वी होणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
केजरीवाल यांनी पराभव स्वीकारत भाजपचे अभिनंदन केले
दरम्यान, निवडणूक निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी जाहीरपणे पराभव स्वीकारला आणि विजयाबद्दल भाजपचे अभिनंदन केले. ते म्हणाले, "आम्ही जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारतो. या मोठ्या विजयासाठी मी भाजपचे अभिनंदन करतो आणि आशा करतो की ते जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील." 'आप'ने गेल्या 10 वर्षात शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी अशा क्षेत्रात काम केले, मात्र आता विरोधी पक्षाची भूमिका बजावत जनतेची सेवा करत राहणार असल्याचेही ते म्हणाले. निवडणूक चमकदारपणे लढल्याबद्दल त्यांनी आप कार्यकर्त्यांचे आभार मानले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

