एक्स्प्लोर

Solar Energy :राज्यात 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार; 3 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प 2.0 मधून 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करणार असल्याचं म्हटलं.

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या ऊर्जानिर्मितीबाबतच्या भावी वाटचालीची तपशीलवार व विस्तृत माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करुन कार्बन उत्सर्जनात घट आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा देऊन शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. राज्यात शाश्वत विकासास चालना देण्यासाठी महानिर्मितीतर्फे 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प ‘मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प 2.0’ अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहेत. या प्रकल्पांमुळे राज्यातील 3 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

महानिर्मितीचे वैशिष्ट्य व सौर प्रकल्पांची योजना

महानिर्मिती (म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनी) ही 13,880 मेगावॅट क्षमतेसह भारतातील सर्वात मोठ्या राज्य-नियंत्रित विद्युत उत्पादकांपैकी एक

'एनटीपीसी'नंतर (NTPC) देशातील दुसऱ्या क्रमांकाची राज्य मालकीची एनर्जी जनरेशन कंपनी

औष्णिक, वायू, जल व सौर अशा विविध स्त्रोतांतून ऊर्जानिर्मिती

कमी दरात वीज पुरवठा करत कार्बन उत्सर्जन घटवण्यावर भर

जीईएपीपी इंडिया (Global Energy Alliance for People and Planet)

रॉकफेलर फाउंडेशन, आयकिया फाउंडेशन आणि बेझोस अर्थ फंड यांच्या सहकार्याने स्थापन

विकसनशील देशांमध्ये न्याय्य व हरित ऊर्जा प्रणालीसाठी कार्यरत

जीईएपीपी एलएलसीची भारतीय शाखा – भारतात वितरणक्षम ऊर्जेसाठी उपयुक्त उपक्रमांची अंमलबजावणी करते

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0

पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवणे व शाश्वत ऊर्जेचा वापर

दिवसा अखंडित वीज पुरवठा करून शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढवणे हे राज्य शासनाचे ध्येय

2025 पर्यंत 30% कृषी फीडरचे सोलरायझेशनचे उद्दिष्ट – मिशन 2025

0.5 ते 25 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प वितरण उपकेंद्राच्या 5-10 किमी परिघात उभारणे

जीईएपीपी सहकार्याने अंमलबजावणी

जीईएपीपी इंडिया प्रकल्पासाठी PMU (Project Monitoring Unit) व डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार

माहिती संकलन, सद्यस्थितीचे परीक्षण व सुलभ व्यवस्थापन शक्य होणार

तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या मदतीने प्रभावी अंमलबजावणी

प्रकल्प व्यवस्थापन व देखरेख

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेबाबत मार्गदर्शनासाठी धोरणात्मक संयुक्त समिती स्थापन होणार

सेंट्रल डॅशबोर्डच्या माध्यमातून जमीन संपादन ते प्रकल्प प्रगतीचे दैनंदिन निरीक्षण

सर्व भागधारकांसाठी प्रशिक्षण आयोजित करून वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर भर

प्रकल्पामुळे नव्या रोजगार संधींची निर्मिती होणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Embed widget