एक्स्प्लोर

Dell Layoffs : आता डेल कंपनीकडून नोकरकपात, हजारो कर्मचाऱ्यांना देणार नारळ; 6000 हून अधिक जणांचा रोजगार धोक्यात

Dell Layoffs : डेल टेक्नोलॉजी कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. त्यामुळे जगभरातील हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे.

Dell Layoffs 2023 : आर्थिक मंदीच्या (Recession) सावटाखाली जगभरात अनेक दिग्गज कंपन्यांकडून नोकरकपात (Layoff) सुरु आहे. त्यातच आता आणखी एक टेक कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे. दिग्गज टेक कंपनी डेल आता 6000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, डेल कंपनीकडून अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्यात येणार आहे. कंपनी जगभरातील हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डेल टेक्नोलॉजी कंपनी जगभरातील 5 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा अंदाज मीडिया रिपोर्टनुसार, व्यक्त करण्यात आला आहे. 

डेल कंपनीकडून नोकरकपात

संगणक निर्माती कंपनी डेल टेक्नोलॉजीज (Dell Technologies) या वर्षी म्हणजे 2023 मध्ये कर्मचारी कपात करणारी पहिली टेक कंपनी आहे. 2022 मध्ये अनेक मोठ-मोठ्या टेक कंपन्या तसेच इतर क्षेत्रातील कंपन्यांनानीही नोकरकपात केली होती. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, को-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी सांगितले की, कंपनी बाजारातील परिस्थितीवर अवलंबून आहे. भविष्यात कंपनी आणखी कर्मचारी कमी करू शकते.

6000 हून अधिक जणांचा रोजगार धोक्यात

डेल टेक्नोलॉजीज (Dell Technologies) ने आपल्या 6000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेल आपल्या जागतिक कर्मचार्‍यांपैकी पाच टक्के कमी करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे येत्या काळात संगणक निर्मात्या डेल कंपनीतील सुमारे 6650 कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे.

हजारो कर्मचाऱ्यांना देणार नारळ

डेल कंपनीचे सह-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी एका निवेदनामध्ये लिहिले आहे की, कंपनी फार कठीण आर्थिक परिस्थितीतून जात आहे. कंपनीला बाजारात मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. सध्याची परिस्थिती पाहता येत्या काळातील कंपनीला आपलं भविष्य अनिश्चित दिसत आहे. त्यामुळे यातील समतोल राखण्यासाठी कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. IDC च्या मते, जर आपण मोठ्या कंपन्यांबद्दल बोललो तर, 2022 च्या चौथ्या तिमाहीत डेलच्या शिपमेंटमध्ये सर्वाधिक 37 टक्के घट झाली आहे.

जेफ क्लार्क यांनी पुढे सांगितले की, 'मंदीमुळे जागतिक बाजारपेठेत आव्हानात्मक परिस्थितीचा निर्माण झाली आहे. कोणत्याही कंपनीतील छाटणी बाजारातील परिस्थितीवर अवलंबून असते. आम्ही भूतकाळातही आर्थिक मंदीचा सामना केला आहे आणि मोठ्या जिद्दीने त्यातून सावरत अधित मजबूत झालो. 2020 मध्ये जेव्हा कोरोना महामारीचा फटका बसला, त्यातूनही आम्ही सावरलो.'

महत्त्वाच्या इतर बातम्या :

OLX Layoff: आता OLX करणार 15 टक्के नोकरकपात, 1500 कर्मचाऱ्याचं भविष्य धोक्यात; भारतात काय परिणाम होणार?

महत्त्वाच्या बातम्या

FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Embed widget