एक्स्प्लोर

OLX Layoff: आता OLX करणार 15 टक्के नोकरकपात, 1500 कर्मचाऱ्याचं भविष्य धोक्यात; भारतात काय परिणाम होणार?

OLX Layoff : ओएलएक्स कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, भविष्यातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कंपनीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

OLX to Layoff 15 Percent Workforce Globally : जागतिक मंदीच्या (Recession) सावटामुळे जगभरातील दिग्गज कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकरकपात (Layoff) करण्यात आली आहे. त्यातच आताच डच कंपनी ओएलएक्स (OLX) कडूनही अनेक कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार आहे. OLX कंपनी जगभरातील 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. यामुळे 1500 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार असून त्यांचं भविष्य धोक्यात आहे. ओएलएक्स कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, भविष्यातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कंपनीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

OLX 15 टक्के नोकरकपात करणार

ओएलएक्स कंपनी लवकरच 15 टक्के नोकरकपात करणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक टेक कंपन्यांनी देशासह जगभरातील अनेक कामगारांना कामावरून काढून टाकलं आहे. त्यातच आता OLX कंपनीने देखील जाहीर केले आहे की, ते त्यांच्या जगभरातील कर्मचार्‍यांपैकी 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहेत. कंपनीने यामागे मागणी आणि नफा कमी झाल्याचं कारण दिलं आहे.

कर्मचारी कमी करण्यामागे 'हे' आहे कारण

OLX कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, 'ओएलएक्स कंपनी जगभरातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत 15 टक्के कपात करणार आहे. यामुळे सर्व देशांतील कर्मचारी, व्यावसायिक युनिट्स आणि कामावर परिणाम होईल. बदलत्या स्थूल आर्थिक परिस्थितीमुळे कंपनी खर्च कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करत आहे. भविष्यातील गरज आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

भारतात इंजिनीअरींग आणि ऑपरेशनल टीमला धोका

कंपनीच्या प्रवक्त्याने मीडियाला सांगितले की, 'आम्ही आमच्या कर्मचार्‍यांची संख्या कमी करत आहोत ही खेदजनक बाब आहे. कर्मचार्‍यांनी कंपनीसाठी दिलेल्या मौल्यवान योगदानासाठी आम्ही दिलगीर आहोत. पण, आपल्या भविष्यातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नोकरकपात करणे आवश्यक आहे. या कर्मचाऱ्यांच्या छाटणीमुळे भारतात किती कर्मचार्‍यांवर परिणाम होईल याबद्दल कोणतीही अचूक आकडेवारी समोर आलेली नाही. पण, या छाटणीचा सर्वाधिक फटका इंजिनीअरींग आणि ऑपरेशनल टीमला बसण्याची शक्यता आहे.

'या' कंपन्यांकडूनही नोकरकपात

OLX आधीही अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची छाटणी केली आहे. गुगल (Google), मायक्रोसॉफ्ट (Microsoft), ॲमेझॉन (Amazon), मेटा (Meta), ट्विटर (Twitter), IBM, SAP, स्विगी (Swiggy) या कंपन्यांनीही अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. जागतिक मंदीच्या सावटामुळे अनेक कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Unemployment : 2023 वर्षात 20.8 कोटी जणांच्या नोकऱ्या जाणार, जगभरात नोकरकपातीचं संकट आणखी गडद; धक्कादायक अहवाल

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Teacher Recruitment : शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?
Marathi Gujarati Dispute Jobs Advertise Mumbai: 'फक्त गुजराती-मारवाडी नोकरीसाठी अर्ज करू शकतात...'; नोकरी डॉट कॉम, लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे संतापाची लाट, मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद चिघळणार?
'फक्त गुजराती-मारवाडी नोकरीसाठी अर्ज करू शकतात...'; नोकरी डॉट कॉम, लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे संतापाची लाट, मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद चिघळणार?
जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यास सुरुवात
जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यास सुरुवात

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget