Share Market : सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजार वधारला, Nifty 16,352 वर तर Sensex मध्ये 632 अंकांची वाढ
Stock Market : ऑईल अॅन्ड गॅस वगळता इतर सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. BSE मिडकॅपमध्ये आणि स्मॉलकॅपमध्ये 1 टक्क्याची वाढ झाली आहे.

मुंबई: आठवड्याचा शेवट गुंतवणूकदारांसाठी चांगला ठरला आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 632 अंकांनी वाढला तर निफ्टीही 182 अंकानी वाढला. सेन्सेक्समध्ये 1.17 टक्क्यांची वाढ होऊन तो 54,884 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.13 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,352 वर पोहोचला आहे.
आज 2152 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1099 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 119 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑईल अॅन्ड गॅस वगळता इतर सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅपमध्ये आणि स्मॉलकॅपमध्ये 1 टक्क्याची वाढ झाली आहे.
शुक्रवारी शेअर बाजारात Apollo Hospitals, Tech Mahindra, HDFC Life, Hero MotoCorp आणि IndusInd Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली असून ONGC, NTPC, Bharti Airtel, Power Grid Corp आणि Tata Steel या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- Apollo Hospital- 5.43 टक्के
- Tech Mahindra- 4.14 टक्के
- HDFC Life- 3.47 टक्के
- Hero Motocorp- 3.16 टक्के
- IndusInd Bank- 3.10 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली
- ONGC- 5.33 टक्के
- NTPC- 2.40 टक्के
- Bharti Airtel- 1.33 टक्के
- Power Grid Corp- 1.10 टक्के
- Tata Steel- 0.81 टक्के
महत्त्वाच्या बातम्या:























